धक्का लागला म्हणून तिने प्रवाशाला झोडपले, प्रवासी ट्रॅकवर पडला अन्…

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत एक हैराण करणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनवर एका इसमाचा महिला प्रवाशाशी वाद झाला. मात्र त्या भांडणाचा हिंसक आणि दुःखद अंत झाला.

  मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत एक हैराण करणारा धक्कादायक प्रकार घडला आहे. मध्य रेल्वेच्या सायन स्टेशनवर एका इसमाचा महिला प्रवाशाशी वाद झाला. मात्र त्या भांडणाचा हिंसक आणि दुःखद अंत झाला. पत्नीला धक्का लागल्याचे पाहून तिचा पती त्या इसमाशी भांडू लागला, त्याला मारहाणही केली. त्या दरम्यान मध्येच त्या इसमाचा तोल गेल्याने तो रेल्वे ट्रॅकवर कोसळला आणि समोरून वेगाने आलेल्या ट्रेनखाली सापडून त्याचा अंत झाला.

  ही घटना रविवारी रात्री 9.10 वाजता घडली. तिचे सीसीटीव्ही फुटेज आज गुरुवारी उजेडात आले. यासंबंधीच्या वृत्तानुसार, शीतल माने व त्यांचा पती अविनाश माने हे धारावीचे दाम्पत्य सायनहून मानखुर्दला जात होते. ते प्लॅटफॉर्मला रेल्वेची वाट पाहत होते. यावेळी 26 वर्षीय दिनेश राठोड नामक व्यक्तीचा शीतल माने यांना धक्का लागला.

  काय आहे घटना? 

  दिनेश राठोड यांचा धक्का लागल्यानंतर महिलेने त्यांना आपल्या जवळच्या छत्रीने मारहाण करण्यास सुरुवात केली. हे पाहून त्यांच्या पतीने दिनेश यांच्या कानशिलात जोरदार थापड मारली. ही थापड एवढी जोरदार होती की, दिनेश थेट रेल्वे रुळावर जाऊन पडला. तेवढ्यात अचानक लोकल आणि ते तिच्याखाली सापडले.

  या घटनेत जखमी झालेल्या दिनेश यांना तातडीने लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

  दादर जीआरपीने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर या प्रकरणी 31 वर्षीय अविनाश माने व त्यांच्या पत्नी 30 वर्षीय शीतल माने यांना अटक केली आहे.

  कोण होता मृत तरुण?

  मृत दिनेश राठोड मुंबईच्या BEST मध्ये ( बस सेवा ) लोडर म्हणून काम करत होते. प्राथमिक चौकशीत त्यांनी मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले होते.