
पुणे- बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोपेगावच्या हद्दीत हॉटेलवर थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधून तब्बल २२ लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
वाई : पुणे- बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोपेगावच्या हद्दीत हॉटेलवर थांबलेल्या ट्रॅव्हल्स मधून तब्बल २२ लाख रुपयांची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे. भुईंज पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथक तयार केले असुन, सीसीटिव्ही फुटेज तपासले जाात असुन लवकरच चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी ७:३० ते ८:१० वाजण्याच्या सुमारास वाई तालुक्यातील बोपेगाव गावच्या हद्दीत असलेल्या कोहिनूर हॉटेलच्या आवारात व्ही आर एल ट्रॅव्हल्स नंबर KA २५ D ४८६३ थांबली होती त्यातील प्रवाशी नरेंद्र प्रल्हादसिंह गिरासे (वय ४२) हे बस चहा नाष्टा करण्यासाठी थांबल्यावर ते खाली उतरुन बाथरूमला गेले होते. बाथरूमला जायच्या आधी त्यांच्या जवळ दोन लाखांची रोख रक्कम असणारी काळ्या रंगाची बॅग त्यांनी ट्रॅव्हल्स मध्येच ठेवली होती ते लगेच परत ट्रॅव्हल्स मध्ये आले तेव्हा त्यांच्या जवळ असणारी काळ्या रंगाची बॅग व त्यामध्ये ठेवलेले सुवर्णा बिल्डकॉन कंपनीच्या मशीनरी विक्रीचे असलेले २२ लाख रुपयांची रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले याची माहीती त्यांनी बस चालकाला दिली.
चालकाने संपूर्ण बसची तपासणी केली असता बॅग मिळुन न आल्याने अखेर या घटनेची माहिती भुईंज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी देखील संपूर्ण बसची तपासणी केली असता बॅग मिळुन न आल्याने अखेर प्रवाशी नरेंद्र गिरासे यांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात भुईंज पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली आहे. याचा अधिक तपास वाईचे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम सहाय्यक पोलिस निरिक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे यांच्यासह भुईंज पोलिस पोलिस ठाण्यातील डिबी विभागाचे पोलिस कर्मचारी करत आहेत. यातील आरोपीला लवकरच गजाआड करण्यास आम्हाला यश येईल, असा विश्वास रमेश गर्जे यांनी व्यक्त केला आहे.