५ महिन्यात तब्बल ६० टक्के प्रवाश्यांनी केला तिकीटासाठी डिजिटल पद्धतीचा वापर

जग डिजिटलाईझेशनं कडे वळत असताना बेस्ट देखील यात मागे राहिलेली नाही. नागरिकांना जलद आणि कमी त्रासात सेवा देण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टम वर अधिक भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्ट ने डिजिटल सेवेवर अधिक भर दिला आहे. 'चलो' सारखी स्मार्ट कार्ड सेवा प्रवाश्यांच्या पसंतीला उतरत आहे.

    मुंबई : प्रदूषण मुक्तीसोबत बेस्ट आता डिजिटल होऊ लागली आहे. आणि याला नागरिक देखील पसंती देउ लागले आहेत. बेस्ट ने सुरू केलेल्या डिजिटल तिकीटाचा नागरिकांकडून वापर सुरू आहे. सुरू केले. गेल्या पाच महिन्यात ६० टक्के प्रवाशांनी डिजिटल पद्धतीचा तिकीट काढण्यासाठी वापर केल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    जग डिजिटलाईझेशनं कडे वळत असताना बेस्ट देखील यात मागे राहिलेली नाही. नागरिकांना जलद आणि कमी त्रासात सेवा देण्यासाठी ऑटोमॅटिक सिस्टम वर अधिक भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून बेस्ट ने डिजिटल सेवेवर अधिक भर दिला आहे. ‘चलो’ सारखी स्मार्ट कार्ड सेवा प्रवाश्यांच्या पसंतीला उतरत आहे. बेस्टचे १२ टक्के प्रवासी चलो ऍप चा वापर करत आहेत.बेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी डिजिटल सिस्टम वर भर दिला आहे. बेस्ट सह प्रवाश्यांना ही याचा फायदा होत असून या सेवांचा अधिक विस्तार करण्यात येत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

    बेस्टने स्मार्ट कार्डच्या माध्यमातून ऑनलाईन सेवा देण्यावर ही भर दिला आहे. त्याचाच एक भाग असणाऱ्या डिजिटल तिकीटिंगमुळे प्रवाश्यांना घर बसल्या सेवा मिळत आहेत. प्रवाश्यांना ऑनलाइन रिचार्ज ची सुविधा उपलब्ध झाली आहे. यामुळे प्रवासी आणि वाहकांमधील सुट्ट्या पैशांचा वाद ही संपला. प्रवाश्यांच्या रांगा संपल्या.त्यामुळे प्रवास सुखकर होऊ लागला. डिजिटल सेवेचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढत असून गेल्या पाच महिन्यात ६० टक्के म्हणजे १८ लाखापेक्षा अधिक प्रवाश्यांनी वापर केला असल्याची माहिती बेस्ट कडून देण्यात आली.