प्रताप सरनाईकांकडून तुळजाभवानीला तब्बल ७५ तोळे सोने अर्पण

तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी नवस केला होता. तसेच, दोन्ही नातवंडांचे जायवळ करायचे होते. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असा नवस केला होता. मध्यंतरी कोरोना काळ आणि काही संकटांमुळे येता आले नव्हते. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेले नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

    ठाणे – आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी तुळजाभवानी देवीला (TuljaBhavani Devi) ७५ तोळे सोने (Gold) अर्पण केले आहे. प्रताप सरनाईक आपल्या कुटुंबीयांसोबत तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी तब्बल ३७ लाख ५० हजार किमतीचे ७५ तोळे सोन्याचे दागिने देवीच्या चरणी अर्पण केले. आपण केलेला नवस पूर्ण (Vow Fullfilled) झाल्याने दागिने अर्पण केल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

    तुळजाभवानी आमची कुलदैवता आहे. माझ्या दोन्ही मुलांच्या लग्नावेळी (Sons Marriage) नवस केला होता. तसेच, दोन्ही नातवंडांचे जायवळ करायचे होते. नवस फेडण्यासाठी आम्ही येथे आलो होतो. ५१ तोळ्यांच्या पादुका आणि २१ तोळ्याचा हार देईन असा नवस केला होता. मध्यंतरी कोरोना काळ आणि काही संकटांमुळे येता आले नव्हते. प्रसिद्धी किंवा प्रसारमाध्यमांसाठी हे काही केलेले नाही. वर्षातून एकदा मी दर्शनासाठी येत असतो, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

    देवीकडे मांडलेले गाऱ्हाणे पूर्ण झाल्यानेच पत्नी, दोन्ही मुले, सूना आणि नातू यांना घेऊन गेले. मी पहिल्या मुलाच्या लग्नावेळी ५१ तोळ्याचा आणि दुसऱ्या मुलाच्या लग्नावेळी २१ तोळ्याचा हार घालेन असे म्हटले होते. पत्नीनेच साकडे घातले असल्याने तिने सोनाराकडून दागिने बनवून घेतले. दोन वर्षांपासून ते दागिने आमच्याकडे होते. कोरोनामुळे मंदिरे बंद होती, तसेच इतर संकटे आल्याने येऊ शकलो नव्हतो. पण आता वेळ मिळाल्याने आम्ही आलो, अशी माहिती प्रताप सरनाईकांनी दिली.