Crime News

मुंबईतील भांडुपनंतर बीडमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. बीडमधील गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर इनोव्हा गाडीमध्ये तब्बल १ कोटी पेक्षा जास्त रक्कम सापडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.

    राज्यभरात लोकसभा निवडणुकीचे (Maharashtra Loksabha Election) वारे वाहू लागले आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात अनेक ठिकाणी पैशांचा गैरवापर केला जात असल्याने निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. मुंबईतील भांडुपनंतर बीडमध्ये पैशाने भरलेली गाडी पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे. बीडमधील गेवराई तालुक्यातील चेकपोस्टवर इनोव्हा गाडीमध्ये तब्बल १ कोटी पेक्षा जास्त रक्कम सापडल्याने सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. बॉर्डर चेक पोस्टवर गाडीच्या तपासणीदरम्यान गाडीमध्ये कोटी रुपयांची रक्कम आढळून आल्याने सगळीकडे एकाच खळबळ उडाली आहे. गेवराई तालुक्यातील खामगावमध्ये ४या तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास हा सर्व प्रकार घडला.

    निवडणुकीच्या काळात पैशांसंबंधित अनेक गुन्हे घडत आहेत. सतत घडत असलेले गुन्हे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचे भरारी पथकाकडून अनेक ठिकाणी करावी करण्यात आली आहे. बीडमध्ये सापडलेल्या रक्कमेपैकी दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम ही कोषागार कार्यालयाकडे सुपूर्त केली जाणार आहे. तर आयकर विभागाकडून ही रक्कम छत्रपती संभाजीनगर येथील बँकेच्या शाखेतून काढण्यात आली होती की नाही याचा तपास करत आहे. प्रशासनाच्या सांगण्यानुसार, संभाजीनगरमधील द्वारकादास मंत्री बँकेच्या शाखेतून ही रक्कम बीडमधील शाखेत आणली जात आहे. रक्कम सापडलेल्या गाडीमध्ये पैसे बाळगण्याचे परवानगी पत्र होते, असे देखील सांगण्यात आले आहे.

    मुंबईमध्ये पोलिसांकडून बनावट नोटा बनवणाऱ्या कारखान्यावर जप्त आणण्यात आली. या कारखान्यातून सुमारे ५,१०,१००,५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. मुंबई पोलिसांच्या पथकाने कारखान्यावर धड टाकून बनावट नोटा आणि लाखोंचा कागद साठा जप्त केला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी नौशाद शाह आणि अली सय्यद या दोघांना ताब्यात घेतले आहे. आरोपींना न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरु आहे.