As much as Rs 85 Crore 9 Lakh proposal in Dulkhat, tribal research students are deprived of scholarship

आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या आयुक्तांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे. चार महिने लोटून गेले तरी या प्रस्तावास मंजुरी मिळाली नाही. सदर प्रस्तावास मंजुरी देऊन उमेदवारांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ट्रायबल फोरम यवतमाळ यांनी केली आहे.

    यवतमाळ :  अनुसूचित जमातीच्या (Scheduled Tribes) विद्यार्थ्यांना पी.एचडी अभ्यासक्रमासाठी आर्थिक सहाय्य मिळावे म्हणून आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेच्या (Tribal Research and Training Institute Pune) आयुक्तांनी ८५ कोटी ९ लक्ष १७ हजार रुपयांचा सुधारित प्रस्ताव तयार करुन १७ मार्च २०२२ रोजी शासनाकडे पाठविला आहे. चार महिने लोटून गेले तरी या प्रस्तावास मंजूरी मिळाली नाही. सदर प्रस्तावास मंजुरी देऊन अनुसूचित जमातीच्या संशोधक उमेदवारांना आर्थिक सहाय्य करण्यात यावे. अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांचेकडे ट्रायबल फोरम (Tribal Forum) यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे (District President Praful Kove) यांनी केली आहे.

    अनुसूचित जमाती विद्यावाचस्पती संशोधक विद्यार्थ्यांना संशोधनाकरिता आजपर्यंत आदिवासी विकास विभागातर्फे कोणत्याही प्रकारचे आर्थिक सहाय्य व संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले नाही. राष्ट्रीय स्तरावर केंद्रीय आदिवासी मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय अनुसूचित जमाती अभिछात्रवृत्ती (एनटीएफएस) (NTFS) मिळते. पण, काही किचकट अटींमुळे महाराष्ट्रातील नगण्य अनुसूचित जमातीच्या संशोधक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळतो. त्याचे प्रमाणही अत्यंत नगण्य आहे. ज्या संशोधक विद्यार्थ्यांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती अभिछात्रवृत्तीचा लाभ मिळत नाही, त्यांना बर्‍याच आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते आणि बर्‍याचदा काही विद्यार्थी संशोधन प्रकल्प अर्ध्यावर सोडून देतात.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी) (Barty) यांची स्थापना १९७९ मध्ये झाली. सन १९१३ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी न्यूयॉर्क येथे उच्च शिक्षणासाठी कोलंबिया विद्यापीठाचा ऐतिहासिक प्रवास केला. या स्मृतिप्रित्यर्थ बार्टीने २०१३ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल रिसर्च फेलोशिप (BANRF) सुरू केली, त्यानंतर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे (सारथी) ( Sarthi ) यांची स्थापना २०१३ साली झाली.

    त्यांना मराठा, कुणबी, कुणबी – मराठा व मराठा – कुणबी प्रवर्गातील उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मेहनती आणि गुणवत्ताधारक पी. एचडी. करणारे उमेदवारांसाठी सारथी मार्फत ‘छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती (CSMNRF-2019) सुरू केली. त्याचप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना २०१९ मध्ये झाली असली तरी, महाज्योतीने इतर मागासवर्गीय, विमुक्त-जाती, भटक्या-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांना (MJFRF-२०२०) संशोधन अधिछात्रवृत्ती सुरू केली आहे.

    वरील तीनही संशोधन संस्था या पुणेस्थित आहेत आणि टिआरटीआय ही संशोधन संस्था देखील पुण्यातच आहे. इतकेच नसून टिआरटीआय ही संस्था या सगळ्या संस्थांपेक्षा सर्वात जुनी तसेच भारतीय संविधानकृत आणि स्वायत्त संस्था आहे. वरील संस्था त्या त्या सामाजिक प्रवर्गातील संशोधक विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीस प्रोत्साहन देण्यासाठी पूर्ण आर्थिक सहाय्य करतात. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेने सुद्धा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना संशोधक अधिछात्रवृत्तीस प्रोत्साहन द्यावे. राज्यातील अनुसूचित जमातीच्या संशोधकासाठी अभिछात्रवृत्ती सुरू करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रफुल कोवे यांनी केली आहे.