एमटी आयटीएफ एस 400 वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मालपाणी; राजेश गणपती, गौतम गाडगीठ यांची आगेकूच

  पुणे : आयटीएफ, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व आर्यन पंप्स यांनी प्रायोजित केलेल्या एमटी आयटीएफ एस 400(गुण) वरिष्ठ टेनिस अजिंक्यपद  स्पर्धेत आशिष मालपाणी, राजेश गणपती, गौतम गाडगीळ यांनी आपापल्या गटातील मानांकित खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.

  सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली

  डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत  50 वर्षांवरील गटात उपांत्यपूर्व फेरीत आठव्या मानांकित आशिष मालपाणीने तिसऱ्या मानांकित बालन रमादासचा 7-5, 6-0 असा तर, पाचव्या मानांकित राजेश गणपतीने चौथ्या मानांकित आशिष पंतचा 6-2, 6-2 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.

  35 वर्षांवरील गटात उपांत्यपूर्व फेरीत केतन धुमाळ, रवींद्रनाथ पांडे, नितीन सावंत, श्रीकांत कुमावत यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

  40 वर्षांवरील गटात उप-उपांत्यपूर्व फेरीत बिगरमानांकीत गौतम गाडगीळने आठव्या मानांकित अमित किंडोचा 6-4, 6-1 असा पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदवला. तिसऱ्या मानांकित संदीप पवारने नवव्या मानांकित अभिजीत मुझुमदारला 1-6 6-4 [10-7] असे पराभूत केले. अव्वल मानांकित  आदित्य खन्नाने आदित्य कानिटकरवर 6-2 6-4 असा विजय मिळवला. दुसऱ्या मानांकित मंदार वाकणकरने बाराव्या मानांकित सदाशिवम एसचे आव्हान 6-1 6-2 असे संपुष्टात आणले.

  स्पर्धेचा सविस्तर निकाल : 30 वर्षांवरील गट: उपांत्यपूर्व फेरी:
  विशाल विष्णू(भारत)वि.वि.अमृत सुंदरकुमार(भारत)[7]6-0,6-0;
  पार्थ चिवटे(भारत)वि.वि.अजिंक्य पाटणकर(भारत)6-2 6-2;
  प्रसनजीत पॉल(भारत)वि.वि.अंकित कापसे(भारत) 6-2, 6-1;
  राघवेंद्र सुब्रमण्य(भारत)(8)वि.वि.अरुण भोसले(भारत) [2]7-6(3) 2-6 [10-4];

  35 वर्षांवरील गट : उपांत्यपूर्व फेरी :
  रवींद्रनाथ पांडे(भारत)वि.वि.मिलिंद मारणे(भारत) [6]6-3 3-0 सामना सोडून दिला;
  नितीन सावंत(भारत)[4] वि.वि.नितीन राजपुरे(भारत)6-4 6-4;
  श्रीकांत कुमावत(भारत)[3]वि.वि.गणेश देवखिळे(भारत) [5] 6-2, 6-2;
  केतन धुमाळ(भारत)(2)वि.वि.नरहर गर्गे(भारत)[8] 7-5, 6-4

  40 वर्षांवरील गट : उप-उपांत्यपूर्व फेरी :
  अमित टिळक(भारत)[6]वि.वि.हरीश रामचंदानी(भारत) [11] 6-0, 6-1;
  श्रीराम ओका(भारत)वि.वि.गिरीश मिश्रा(भारत)[5] 1-0 सामना सोडून दिला;
  संदीप पवार(भारत) [3]वि.वि.अभिजीत मुझुमदार(भारत)[9] 1-6 6-4 [10-7];
  गौतम गाडगीळ(भारत)वि.वि.अमित किंडो(भारत)[8]6-4, 6-1;
  आदित्य खन्ना(भारत)[1]वि.वि.आदित्य कानिटकर(भारत)6-2 6-4;
  पुनर भसीन(भारत)[7]वि.वि.मधुर इंगळहळीकर(भारत)6-1, 6-1;
  स्वरनदीप सिंग दोडी(भारत)[4]वि.वि.विकास शिगवण(भारत)6-0 6-3;
  मंदार वाकणकर(भारत)[2]वि.वि.सदाशिवम एस(भारत)[12]6-1 6-2;

  45 वर्षांवरील गट: उपांत्यपूर्व फेरी :
  नितीन किर्तने(भारत)[1]वि.वि.अमित शिंदे(भारत) [7]6-0 6-1
  मानव अरोरा (भारत) [3]वि.वि.गिरीश कुकरेजा (IND)6-1 6-3
  नितेश रुंगता(भारत)[4]वि.वि.अपूर्व यतींद्र (IND)6-3, 6-4
  यती गुजराती(भारत) [2]वि.वि.नेल्सन जतीन कुमार(भारत)6-2, 6-4

  50 वर्षांवरील गट : उपांत्यपूर्व फेरी :
  आशीष मालपाणी(भारत)[8]वि.वि.बालन रमादास(भारत)[3] 7-5, 6-0;

  राजेश गणपती(भारत)[5]वि.वि.आशिष पंत(भारत)[4] 6-2, 6-2;
  आरव्हीआरके रंगा राव(भारत) [2]वि.वि.जयप्रकाश निशाद(भारत)[7] 6-1, 6-3;

  40 वर्षांवरील महिला गट: राउंड रॉबिन फेरी :
  राधिका कानिटकर(भारत)वि.वि.आरती गणेश(भारत)6-1, 6-0;

  45 वर्षावरील महिला गट: राउंड रॉबिन फेरी :
  मायूका सकाय(जपान)वि.वि.ज्योत्स्ना पटेल(भारत)6-0 6-0;