अशोक चव्हाणांनी माझ्याबद्दल बोलू नये, अन्यथा…; नाना पटोलेंचा इशारा

नाना पाटोले यांनी अशोक चव्हाणांवर टीकेची झोड उठवली आहे. चव्हाणांनी काँग्रेसबद्दल बोलू नये त्यांचे अंडे पिल्ले काढण्याचे औषध माझ्याकडे आहे, असा इशारा पटोले यांनी दिला आहे.

    नांदेड : लोकसभेच्या प्रचारात अशोक चव्हाण आणि नाना पटोले यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. नाना पाटोले यांनी अशोक चव्हाणांवर टीकेची झोड उठवली आहे. चव्हाणांनी काँग्रेसबद्दल बोलू नये त्यांचे अंडे पिल्ले काढण्याचे औषध माझ्याकडे आहे, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

    बांधकाम विभागाचे मंत्री म्हणुन त्यांचाकडे नोटा छापायची मशीन होती. ती बंद पडल्याने त्याचा त्रास अशोक चव्हाण यांना होत आहे, अशा शब्दांत नाना पटोले यांनी टीका केली आहे. अशोक चव्हाण यांनी काँगेस बद्दल काहीच बोलू नये. अन्यथा त्यांनी केलेली सर्व कामे बाहेर काढण्याचे औषध माझ्याकडे आहे. असा इशारा नाना पटोलेंनी अशोक चव्हाण यांना दिला आहे.

    आमदार प्रशांत बंब यांनी विधानसभेत अशोक चव्हाण यांची चिठ्ठी वाचून दाखवली होती. त्यापेक्षा जास्त माहिती माझ्याकडे आहे, त्यांनी राज्यात काय काय पाप केले याची मोठी यादी माझ्याकडे आहे. ज्या पक्षात राहतात तिथे खड्डा करतात. भाजपात काय खड्डा केला हे निकालानंतर तुम्हाला पाहायला मिळेल, अशी खरमरीत टीका नाना पटोलेंनी केली आहे.