नवी मुंबईतील अशोक गावडे यांचा शिंदे गटात प्रवेश; मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत

नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन महायुती सरकारला पाठींबा जाहीर केला.

    नवी मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक (NCP Corporator) आणि पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन महायुती सरकारला पाठींबा जाहीर केला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगरसेवक अशोक गावडे (Ashok Gawde), माजी नगरसेविका स्वप्ना गावडे, सानपाड्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र ढोबळे, कोपरखैरणेचे तालुकाध्यक्ष मोहन पाडळे, घणसोलीचे तालुकाध्यक्ष हेमंत पाटील, सीबीडी बेलापूरचे तालुकाध्यक्ष अरुण कांबळे, रबाळेचे तालुकाध्यक्ष महेश बिराजदार, तुर्भेचे तालुकाध्यक्ष नियाज शेख यांचा समावेश आहे.

    नवी मुंबई शहर हे अतिशय सुंदर आणि सुनियोजित शहर आहे. मात्र, तरीही या शहरात अनेक नागरी आणि पुनर्विकासाचे प्रश्न प्रलंबित आहेत. मी स्वतः नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी नगरविकास मंत्री असताना अनेक निर्णय घेतले असून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना झाला आहे. यापुढेही नवी मुंबईतील विकासकामे प्राधान्याने पूर्ण करून नागरिकांना न्याय देऊ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

    याशिवाय सामजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष सरिता कांबळे, माजी शिक्षण मंडळ समिती सदस्य अजित सावंत, जिल्हा सरचिटणीस दिलीप सिंह, सामजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कांबळे, शिवाजी गावडे, उपशहर अध्यक्ष राज नायर यांनीही पाठींबा जाहिर केला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते विजय नहाटा, शिवसेना जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के, नवी मुंबईचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, माजी नगरसेवक सुरेश कुलकर्णी आणि शिवसेनेचे नवी मुंबईतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.