
येथील दिवाई अर्बन को. ऑप. बँकेच्या संचालक पदासाठी इतर मागासप्रवर्गातून व्यापारी अशोक शंकर लोखंडे व अनुसूचित जाती-जमातीप्रवर्गातून डॉ. शेखर बाळकृष्णकांबळे यांची बिनविरोध निवडझाली आहे. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदाच्या १५जागांसाठी ५९ अर्ज पात्र ठरले होते.
वाई : येथील दिवाई अर्बन को. ऑप. बँकेच्या संचालक पदासाठी इतर मागासप्रवर्गातून व्यापारी अशोक शंकर लोखंडे व अनुसूचित जाती-जमातीप्रवर्गातून डॉ. शेखर बाळकृष्णकांबळे यांची बिनविरोध निवडझाली आहे. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकपदाच्या १५जागांसाठी ५९ अर्ज पात्र ठरले होते. त्यापैकी आठ जणांनी नऊnअर्ज lमाघारी घेतल्याने व दोन जण बिनविरोध झाल्याने निवडणूक रिंगणात आता ४८ जण शिल्लक राहिले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारीजनार्दन शिंदे यांनी दिली आहे. बँकेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया दि. २२ मे पासून सुरू झाली असून सर्वसाधारण गटासाठी १०, महिलांसाठी दोन, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून एक विशेष जाती, भटक्या जमाती व विशेष मागास वर्गासाठी एक तसेच इतर मागास वर्गासाठी एक अशी आरक्षण वर्गवारी आहे. संचालक पदासाठी सर्वसाधारण गटात ३८ विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून ५ तर डॉ. शेखर बाळासाहेब कांबळे अशोक लोखंडे महिलांमध्ये ५ अर्ज शिल्लक राहिले आहेत. गेल्या तीन दिवसांत नऊ अर्ज मागे घेतल्याने इतर मागास प्रवर्गातून अशोक शंकर लोखंडे यांची व अनुसूचित जाती / जमाती गटातून डॉ. शेखर काबंळे यांची दुसऱ्यांदा संचालक म्हणून निवड झाली आहे. अर्ज मागे घेणारांमध्ये अविनाश फरांदे, चंद्रशेखर ढवण यशवंत जमदाडे, सुधाकर वाईकर यांचा समावेश आहे. त्यांच्यामुळे वरील दोन जण बिनविरोध निवडून आले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मंगळवार, दि. १३ जून दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. बुधवार दि. १४ जून रोजी चिन्ह वाटप होणार आहे.
आवश्यकता वाटल्यास रविवार दि. २५ जून रोजी मतदान घेण्यात येणार असून दि. २७ जूनला निकाल जाहीर करण्यात येणार असे निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन शिंदे यांनी सांगितले. वाई अर्बन परिवार पॅनेलच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा आज पॅनेल प्रमुख डॉ. सुधीर बोधे,अरुण देव, प्रा. किशोर अभ्यंकर व नरहरी महाबळेश्वरकर यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी डॉ. बोधे म्हणाले, कोरोना संकटामुळे बँकेच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत त्यामुळे सभासदांचे हित जोपासले जावे व निवडणूक खर्चाचा नाहक बोजा बँकेला पडू नये, यासाठी अर्बन परिवाराने वेदमूर्ती के. शंकरराव अभ्यंकर आणि कै. पोपटलाल ओसवाल यांचा आर्थिक शिस्तीचा आदर्श जोपासत बँकेची निवडणूक बिनविरोध’ करण्याचा ठाम निर्धार केला आहे. परंतु इच्छुकांची संख्या अधिक असल्याने तीन -चार पॅनेल होण्याची शक्यता होती. त्यावर द.न.पटवर्धन पॅनेल व व्यापारी महासंघ यांच्याशी चर्चा करूनसर्वसमावेशक एक पॅनेल केले आहे. या व्यतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य
करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्तकेली. आज पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सचिन फरांदे, प्रदीप चोरगे, पराग खोपडे, चंद्रकांत खोपडे, विश्वास पवार, नंदकुमार ढगे आर्दीची पॅनेलला पाठिंबा दर्शवणारी भाषणे झाली.
या पॅनेलमध्ये सर्वसाधारण गट अनिल देव, विवेक पटवर्धन,काशीनाथ शेलार, मकरंद मुळ्ये, रमेश ओसवा
महेश राजेमहाडिक, माधव कान्हेरे, स्वप्नील जाधव, प्रीतम भुतकर, महारा ज्योती गांधी, सुनीती गोवित्रीकर. विमुक्त जाती/ भटक्या जमाती / विशेष मागास प्रवर्ग : चंद्रकांत गुजर यांचा समावेश आहे. विद्यमान अध्यक्ष सी. व्ही. काळे, उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी यांच्यासह काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांचे अर्ज रिंगणात असल्याने त्याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.