तब्बल बारा दिवस होणार कांदा लिलाव, लासलगाव बाजार समितीने केले जाहीर

शेतकरी बांधवांनी आपली गैरसोय होऊ नये म्हणून वरील दिवशी कांदा व धान्य हा शेतीमाल विक्रीस आणू नये असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.

    नाशिक : आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आज मंगळवार दि 7 नोव्हेंबर पासून ते शनिवार दि 18 नोव्हेंबर पर्यंत दीपावली व साप्ताहिक सुट्ट्यानिमित्त तब्बल बारा दिवस कांदा लिलाव तर नऊ दिवस धान्य लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय लासलगाव बाजार समितीने जाहीर केला आहे.

    लासलगाव मर्चन्टस् असोसिएशनने कांदा व धान्य विभागातील व्यापारी वर्गाचे पत्रानुसार आज मंगळवार दि. 7 नोव्हेंबर ते शनिवार दि.18 नोव्हेंबर पर्यंत दिवाळी सणानिमित्त कांदा विभागातील व्यापारी वर्ग हे कांदा या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने व शुक्रवार दि.10 ते शनिवार दि.18 नोव्हेंबर अखेर धान्य विभागातील व्यापारी वर्ग हे धान्य या शेतीमालाचे लिलावात सहभागी होणार नसल्याने सदर कालावधीत लासलगाव मुख्य बाजार आवारावरील कांदा व धान्य या शेतीमालाचे लिलाव बंद राहतील. तरी शेतकरी बांधवांनी आपली गैरसोय होऊ नये म्हणून वरील दिवशी कांदा व धान्य हा शेतीमाल विक्रीस आणू नये असे आवाहन लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे.