असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब यांचा भाजपत प्रवेश

भाजप राष्ट्रीय प्रदेश महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश ; विकासाला चालना देण्यासाठी पक्षप्रवेश - सरपंच चंद्रकांत डामरे

    कणकवली : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब, यांच्यासह उबाठा सेनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन हा पक्षप्रवेश करण्यात आला.

    कणकवली येथे आयोजित महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, उपसरपंच सचिन परब यांच्या समवेत उबाठा सेनेचे विभागीय शाखा संघटक मनोज लोके, विजय खरात, सचिन हरमलकर, प्रवीण डगरे, हर्षद परब, विजय वरक यांच्यासह असलदे गावातील प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. असलदे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार नितेश राणेंच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास ठेवत हा प्रवेश करण्यात आल्याचे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी सांगितले. तसेच या लोकसभा निवडणुकीत केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विजयात खारीचा वाटा उचलण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला असल्याचे सरपंच डामरे यांनी सांगितले.

    यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायगणकर, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, व्हा.चेअरमन दयानंद हडकर, रघुनाथ लोके, प्रशांत परब, कृष्णा वायगणकर, संतोष परब, किरण परब, संदीप नरे, महेश लोके, उदय परब, दिनेश तावडे, उपसरपंच इरफान साठविलकर, गवस साठविलकर, यासीन म्हास्के आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.