Aditya Thackeray on a two-day Vidarbha tour today

आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने मला खूप दुःख झाले आहे. तिकडे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा अवस्थेत तिथे बसून महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाचा खेळ खेळला जात आहे. आता गुवाहाटीहून आमदारांना गोव्यात घेऊन जाण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.'

    मुंबई – ‘विधानसभेकडे जाणारा मार्ग वरळीतून जातो,’ असा स्पष्ट इशारा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बंडखोरी करणाऱ्या शिवसेनेच्या आमदारांना दिला आहे. ‘शिवसेनेतून घाण बाहेर पडली हे चांगलेच झाले. आता पक्षात जे काही होईल ते चांगलेच होईल. शिवसेना जे आश्वासन देते ते पाळते. मुंबईवर अनेकांनी डोळा ठेवला. पण सेनेने कधीही त्यांची डाळ शिजू दिली नाही. विधानसभेकडे जाणारा मार्ग वरळीतून जातो हे लक्षात ठेवा,’ असे ते म्हणाले.

    ‘मी 32 वर्षांचा आहे. राजकारणात प्रवेश करणे ही माझी चूक होती का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे निघाले तेव्हा सर्वसामान्य नागरिक आणि शिवसैनिकांनी दाखवलेले प्रेम आपण कधीही विसरू शकत नाही,’ असे ते म्हणाले.

    आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आसाममध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याने मला खूप दुःख झाले आहे. तिकडे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा अवस्थेत तिथे बसून महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनाचा खेळ खेळला जात आहे. आता गुवाहाटीहून आमदारांना गोव्यात घेऊन जाण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे.’

    ते पुढे म्हणाले की, ‘शिवसेनेसोबत झालेल्या बंडखोरी विरोधात शिवसैनिकांनी कडवी झुंज दिली. त्यामुळे आज बंडखोरही दिसत नाहीत. मी जेव्हा केव्हा अयोध्येला गेलो, तेव्हा महाराष्ट्र आणि शिवसेनेसाठी काहीतरी चांगले घडले आहे. आता युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना चांगले दिवस येणार असून तुम्ही जोमाने कामाला लागा,’ असा सल्ला त्यांनी युवासैनिकांना दिला आहे.