छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात परिचारिकांनी सुरु केलं काम बंद आंदोलन

कोविड काळात देखील या परिचारिकांनी कार्यकाळ सांभाळला. यावेळी अनेक परिचारिका या आजारी पडल्या, बऱ्याच परिचारिकांनी व्हीआरएस घेतली आहे. मात्र कमी असलेल्या स्टाफसाठी भरती करून स्टाफ वाढवला गेला पाहिजे.

    ठाणे : कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात परिचारिकांनी काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी रुग्णालयातील परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी रुग्णालयात परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असल्याने संपूर्ण भार हा तेथील कार्यरत असलेल्या परिचारिकांवर पडत आहे.

    कोविड काळात देखील या परिचारिकांनी कार्यकाळ सांभाळला. यावेळी अनेक परिचारिका या आजारी पडल्या, बऱ्याच परिचारिकांनी व्हीआरएस घेतली आहे. मात्र कमी असलेल्या स्टाफसाठी भरती करून स्टाफ वाढवला गेला पाहिजे या मागणीसाठी आज रुग्णालयातील परिचारिकांकडून हे काम बंद आंदोलन छेडले असल्याचे सांगण्यात आले.