वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी गृहिताने जगातील सर्वात उंच शिखरावर फडकवला तिरंगा

    ठाणे : जगातील सर्वात उंच शिखर म्हटले तर आठवते माउंट एव्हरेस्ट शिखर. माउंट एव्हरेस्ट हे हिमालयाच्या पर्वत रांगेतील एक उंच शिखर आहे पण जगातील सर्वात उंच शिखर दक्षिण आफ्रिकेतील टांझानिया येथील माउंट किलीमांजारो आहे. ज्याची उंची समुद्र सपाटीपासून ५८९५ मीटर इतकी आहे. महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळख असलेली गृहिता सचिन विचारे हिने १५ ऑगस्ट २०२३ रोजी म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताचा तिरंगा टांझानिया येथील माउंट किलीमांजारोवर फडकवत भारताचे नाव मोठे केले आहे.

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गृहिताला शुभेच्छा

    गृहिताच्या दक्षिण आफ्रिकेच्या मोहिमेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहिताच्या हातात तिरंगा देऊन मोहिमेसाठी शुभेच्छा व आशिर्वाद दिले होते. गृहिता ही टांझानिया येथील सर्वात उंच शिखर माउंट किलीमांजारो येथे भारताचा तिरंगा फडकवणारी सर्वांत कमी वयाची म्हणजेच फक्त ९ वर्षांची पहिली भारतीय आहे. अजून खूप शिखर सर करणार असल्याचे गृहिताने सांगितले.

    गृहिताने माध्यमांशी बोलताना सांगितले अनुभव

    मी ट्रेक पूर्ण केल्याचा आनंद. इंडियावरून आम्ही इथिओपियावर गेलो. 6 तास थांबल्यानंतर दारेसलामवरून किलीमंजोरेला गेलो. नंतर 2 तास गाडीचा प्रवास करून मोशीला गेलो. मग 12 तारखेला म्हारूंगा गेटला गेलो तेथून आमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर म्हंडरा पॉईंटवरून आम्ही किबा होटला गेलो. चालता येत नव्हते. पूर्ण दिवस तिथे चाललो, किबोहोटला आराम केल्यानंतर आम्ही होरोंबोला आलो, त्यानंतर म्हंडारा पॉईंटला गेलो.