Union Minister Nitin Gadkari inaugurates three-day National Conference

सत्तेसाठी राजकीय मंडळी (Politic Leaders) कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा प्रत्यत सध्या येताना दिसतोय. राजकारणातील समाजकारण (Politics Social) संपत चालेले असून, सत्तेसाठी राजकारण आणि क्रिकेटमध्ये (Politics and Cricket) काहीही होऊ शकतं अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Central government Minister Nitin Gadkari) व्यक्त केली  आहे. राजकारणात जो निवडून येतो तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे.

    नागपूर : देशात मागील काही दिवसांपासून राजकारणाचा थर बदलत चालला आहे. सत्तेसाठी राजकीय मंडळी (Politic Leaders) कोणत्याही थराला जाऊ शकतात याचा प्रत्यत सध्या येताना दिसतोय. राजकारणातील समाजकारण (Politics Social) संपत चालेले असून, सत्तेसाठी राजकारण आणि क्रिकेटमध्ये (Politics and Cricket) काहीही होऊ शकतं अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Central government Minister Nitin Gadkari) व्यक्त केली  आहे. राजकारणात जो निवडून येतो तोच सिकंदर अशी आपल्या समाजात भावना आहे. निवडून येणाऱ्या लोकांबद्दल मला फार काही बोलायचं नाही. वेगवेगळ्या प्रकारचे लोक निवडून येत असतात असंही गडकरी (Nitin Gadkari)  म्हणाले. सध्याचे राजकारण पाहता मला राजकारण सोडाव असं वाटतं असं गडकरी म्हणाले. (I want to leave politics says Nitin Gadkari) नागपुरातील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते.

    राज्यात काही दिवसांपासून राजकारणात बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. यामुळे सामान्य जनता, मतदार वैतागले आहेत. राजकारण दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत, सत्तेसाठी घोडेबाजार, कुरघोडी, आरोप प्रत्यारोप आदी राजकारणात वाढल आहे, त्यामुळं जनतेचा सुद्धा विश्वास राजकीय नेत्यांवरील उडत चालला आहे. राजकारण १०० टक्के सत्ताकारण झालं आहे अशी खंत गडकरींनी बोलून दाखवली. दरम्यान, नितीन गडकरी म्हणाले की, राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे समजून घेतलं पाहिजे. महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. पण आता राजकारणात १०० टक्के सत्ताकारण झालं आहे. त्यामुळं मला खूप वेळा राजकारण कधी कधी सोडावं असं वाटतं, असं गडकरींनी म्हटले.