Atpadi Gram Panchayat will be Nagar Panchayat

सांगली जिल्ह्यातील आटपाडी ग्रामपंचायतीची लवकरच ‘नगरपंचायत’ केली जाईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच आटपाडी ही आदर्श नगरपंचायत बनवली जाईल आणि येथील विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती ही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली(Atpadi Gram Panchayat will be Nagar Panchayat).

    सांगली : सांगली जिल्ह्यातील आटपाडी ग्रामपंचायतीची लवकरच ‘नगरपंचायत’ केली जाईल, अशी घोषणा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. तसेच आटपाडी ही आदर्श नगरपंचायत बनवली जाईल आणि येथील विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी माहिती ही मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली(Atpadi Gram Panchayat will be Nagar Panchayat).

    सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील शेतकरी मेळाव्यात मंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते. दुष्काळी भागातील सिंचन योजनेच्या पूर्ततेसाठी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मोठे काम केले आहे.

    या योजनांच्या पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या भागातील सिंचन योजना मार्गी लावल्या जातील अशी माहिती ही मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. छत्रपती संभाजीराजे यांनी जाहीर केलेल्या स्वराज्य संघटनेस मंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.