
कोकणातील रिफायनरी विरोधातील आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत. विरोधी आंदोलकांच्या नेत्याची थेट दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केल्याने आंदोलकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलक नेत्यांना काही संस्था पुरवित असल्याचा आरोप होत असून या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली. तथापि, सरकारकडून दडपशाहीचा वापर होत असल्याची भावना आंदोलकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या चौकशीत एटीएसला फारशी माहिती आढळून आली नसल्याचेही समजते(ATS inquiry into anti-refinery leaders in Konkan).
सिंधुदुर्ग : कोकणातील रिफायनरी विरोधातील आंदोलन तीव्र होण्याची चिन्हे आहेत. विरोधी आंदोलकांच्या नेत्याची थेट दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) चौकशी केल्याने आंदोलकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. आंदोलक नेत्यांना काही संस्था पुरवित असल्याचा आरोप होत असून या पार्श्वभूमीवर ही चौकशी करण्यात आली. तथापि, सरकारकडून दडपशाहीचा वापर होत असल्याची भावना आंदोलकांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या चौकशीत एटीएसला फारशी माहिती आढळून आली नसल्याचेही समजते(ATS inquiry into anti-refinery leaders in Konkan).
आंदोलनाचे नेतृत्व करत असलेल्या काही नेत्यांच्या विविध संस्थांचीही चौकशी सुरू आहे. त्यांचे कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहेत का? त्यांना काही पैसा पुरवला जात आहे का? या दृष्टीनं सध्या माहिती गोळा केली जात आहे. मागील वर्षी रिफायनरी विरोधी आंदोलनाचे प्रमुख नेते सत्यजीत चव्हाण यांची मुंबईत चौकशी झाली होती तसेच प्रमोद जठार यांच्याशी संबंधित संस्थांचीदेखील चौकशी सुरू असल्याची चर्चा आहे.
नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता. मुंबईतही कोकणवासियांच्या बैठका, आंदोलने झाली. त्याच्या परिणामी नाणारमधील नाणार प्रस्तावित प्रकल्प स्थलांतरीत करावा लागला. आता हा प्रकल्प बारसू-सोलगाव येथे प्रस्तावित करण्यात आला आहे. या ठिकाणी प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे.