Clashes between two groups, involved in crime for no reason; Planted wrong clause; Finally granted bail
Pune Crime

  पुणे : मुंढव्यातील एका बड्या हॉटेलात पत्नीसोबत जेवायला गेलेल्या तरुणाला तिघांनी बेदम मारहाण केली. तेव्हा येथील वेटर व मॅनेजरने या तरुणांना शांत राहत शिवीगाळ करू नका, असे सांगितले असता बिअरची बॉटल फोडत दहशत माजवल्याची घटना घडली.

  मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार

  याप्रकरणी पोलिसांनी तिघांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी मंगेश तांबे, अक्षय गावडे, गोट्या यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भैरवनाथ बाबुराव साळुंके (वय ३६, रा. धायरकर वस्ती, मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  बाटलीच्या तुकड्याने साळुंके यांच्यावर वार

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळुंके आणि त्याची पत्नी “बझुका” हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी रात्री गेले होते. आरोपी तांबे, गावडे, गोट्या हे तक्रारदार साळुंखे यांच्या ओळखीचे आहेत. जेवणानंतर त्यांच्यात बिल देण्यावरून वाद झाला. आरोपींनी साळुंके यांना शिवीगाळ करून बिअरची बाटली फोडली. बाटलीच्या तुकड्याने साळुंके यांच्यावर वार केला.

  बिअरची बाटली उगारुन आरोपींकडून दहशत

  तेव्हा हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी वाद घालू नका, असे सांगितल्याने बिअरची बाटली उगारुन आरोपींनी दहशत माजविली. तसेच, ग्राहक व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करुन आरोपी पसार झाले. सहायक निरीक्षक महानोर तपास करत आहेत.