धक्कादायक! ’या’ कारणामुळे झाला डाॅ. प्राची पवार यांच्यावर हल्ला

राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या डॉ. प्राची वसंत पवार यांच्यावर गंगापूर शिवारात धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांनी कट करुन हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. आपल्या नातेवाईकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचा राग आल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

    नाशिक : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या डॉ. प्राची वसंत पवार यांच्यावर गंगापूर शिवारात धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्याप्रकरणी नाशिक तालुका पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. हल्लेखोरांनी कट करुन हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे. आपल्या नातेवाईकाचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचा राग आल्याने आपण हे कृत्य केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे.

    एका संशयिताची आत्या सुश्रृत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होती. मात्र, उपचार सुरु असताना १२ मे २०२१ रोजी मृत्यू झाला होता. हा राग मनात धरुन अभिषेक शिंदे याने त्यांचे साथीदार धनजंय भवरे व पवन सोनवणे यांना प्रत्येकी १० हजार रुपये देण्याचे कबूल करुन डॉ. प्राची पवार यांना अद्दल घडविण्यासाठी हल्ला करण्याचा कट रचला होता.
    १९ डिसेंबर रोजी गोवर्धन शिवारात पवार हाऊस परिसरात डाॅ. प्राची पवार यांच्या इनोव्हा कारला दुचाकी आडवी लावत भांडण करून त्यांच्यावर हल्ला केला होता.संशयितांनी धारधार शस्त्राचा वापर करत जखमी केले होते. नाशिक ग्रामीण पोलीस ठाण्यात ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याची उकल झाल्यामुळे काल नाशिक तालुका पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी अप्पर अधीक्षक माधुरी कांगणे तसेच नाशिक तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.