Attack on female assistant police inspector in fight with Rajapeth police, case filed against four persons

आरोपींनी पोलिसांनी हुज्जत घालून शिविगाळ केली. आम्ही थांबत नाही, तुम्हाला काय करायचे आहे, ते करुन घ्या, असे म्हटले आणि अचानकपणे एपीआय कोठावार यांच्यावर हल्ला केला. एका महिलेने एपीआय कोठावार यांचा गळा दाबून नखाने ओरबडले आणि दुसऱ्या महिलेने त्यांना थापड्यांनी मारहाण केली. तसेच, आरोपी तेडस चुडे यांनी एपीआय कोठावार यांना पकडले आणि बाबु चुडे यांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.

    अमरावती : पोलिसांशी हुज्जत घालून महिला सहायक पोलीस निरीक्षकावर हल्ला (Attack on female assistant police inspector) करणाऱ्या चार जणांविरुध्द राजापेठ पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. बाबु ऊर्फ योगेश चुडे, तेजस चुडे व दोन महिला (सर्व रा. विजयनगर) अशी आरोपींची नावे आहेत. २१ मे रोजी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

    एकीने दाबला गळा, दुसरीने केली मारहाण

    सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका विवेक कोठावार या राजापेठ पोलीस ठाण्यात ( Rajapeth police station ) कार्यरत असून, त्यांनी बाबु चुडे, तेजस चुडे व दोन महिलांना चौकशी तपासकामी पोलीस ठाण्यात बोलाविले होते. दरम्यान तुम्हाला अटक करणार असल्याचे एपीआय कोठावार यांनी चौघांनाही सांगितले असता, आरोपींनी पोलिसांनी हुज्जत घालून शिविगाळ केली. आम्ही थांबत नाही, तुम्हाला काय करायचे आहे, ते करुन घ्या, असे म्हटले आणि अचानकपणे एपीआय कोठावार यांच्यावर हल्ला केला.

    एका महिलेने एपीआय कोठावार यांचा गळा दाबून नखाने ओरबडले आणि दुसऱ्या महिलेने त्यांना थापड्यांनी मारहाण केली. तसेच, आरोपी तेडस चुडे यांनी एपीआय (assistant police inspector kothawar) कोठावार यांना पकडले आणि बाबु चुडे यांनी त्यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. हा प्रकार पाहून तत्काळ तेथे हजर असलेल्या पोलिसांनी एपीआय कोठावार यांना आरोपींच्या तावडीतून सोडले.

     दुप्पट्याने गळा आवळून आत्महत्येची धमकी

    पोलिसांनी एपीआय कोठावार यांची आरोपींची तावडीतून सुटका केल्यानंतरही आरोपी बाबु व तेजस यांनी तुला कापून टाकतो, तुझा मर्डर करतो, अशी जिवानिशी ठार मारण्याची धमकी एपीआय कोठावार यांना दिली. तसेच, बाबु चुडेने स्वता : जवळील दुपट्याने आपला गळा आवळून मी आत्महत्या करतो आणि तुम्हाला फसवितो, अशी धमकी पोलिसांना दिली, असे एपीआय कोठावार यांनी तक्रारीत नमूद केले आहे.