gopichand padalkar
gopichand padalkar

आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. गळ्यात भगवे मफलर घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेत घोषणाबाजी करत आहेत. याच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्याकडून उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

    सांगली – शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सुरू असलेला निष्ठा यात्रा आणि आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. गळ्यात भगवे मफलर घालून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेत घोषणाबाजी करत आहेत. याच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्याकडून उदय सामंत यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. तसेच ‘म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा’, अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशा बोचऱ्या शब्दांत भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे. ते आटपाडीमध्ये बोलत होते.

    ज्या ठिकाणी आदित्य ठाकरे जात आहेत, तिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित राहत आहेत. त्यामुळे हा झंजावात दौरा नाही, एकमेकांना हे फक्त मदत सुरू आहे. म्हसोबाला नाही बायको, सटवाईला नाही नवरा, अशी अवस्था राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसची झाली आहे, अशा शब्दात पडळकरांनी टीका केली आहे. तसेच पुण्यात आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यामागे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचा आरोप देखील पडळकर यांनी केला आहे. पुण्यात शिवसेनेचे कार्यकर्ते नाहीत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीची कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनच हा हल्ला झाला असल्याचा, आरोप करत याआधी आपल्यावर हल्ले झाले. ते राष्ट्रवादीकडून झाले होते, असेही आमदार पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.