
वाठार स्टेशन येथे होऊ दे चर्चा या शिवसेनेच्या कार्यक्रमादरम्यान उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे हे अमित शहा व महाराष्ट्र सरकारवर बरसले
वाठार स्टेशन : १ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर या शिवसेनेच्या होऊ दे चर्चा या कार्यक्रमादरम्यान करूया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आत्ताच्या विद्यमान सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतल्याचे दिसून आले.
सातारा जिल्हा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांनी वाठार स्टेशन येथे होऊ दे चर्चा या शिवसेनेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमादरम्यान शिवसेनेचे माढा लोकसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक राहुल चव्हाण पाटील यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दाखवली होती.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सातारा जिल्ह्याचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांनी विद्यमान सरकारचा आपल्या खरपूस भाषेत चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले आदिलशहा, कुतुबशहा, निजामशाह आणि औरंगजेब बादशाह या सर्व शहाणी महाराष्ट्रावर वेळोवेळी आक्रमण केले होते आणि असाच एक परप्रांतीय अमित शहा हा महाराष्ट्रावर आक्रमण करत आहे याच्या विचाराला उध्वस्त करायचा असेल तर आपण सर्वांनी ठाम राहिले पाहिजे. आणि हे महाराष्ट्रातील जातीवादी सरकार उखडून टाकायला पाहिजे. गेले ८ -९ वर्ष हे सरकार जनतेला विविध योजना सांगून फसवतेय व या फसव्या योजनांचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. अशा खरपूस भाषेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख अमोल आवळे यांनी विद्यमान सरकारचा चांगलाच समाचार घेतल्याचे दिसून आले यावेळी मोठ्या प्रमाणावर वाठार स्टेशन येथील नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.