मोबाईल चोरी करणारा अट्टल चोरटा जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने घेतले ताब्यात

दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी करणारा फरार असलेला अट्टल चोरटा स्वरुपलाल उर्फ दुष्काळ्या काळे (वय २०, रा. धावडेवस्ती, खोरवडी दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे) यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जेरबंद करण्यात यश आले आहे.  

    पाटस : दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी करणारा फरार असलेला अट्टल चोरटा स्वरुपलाल उर्फ दुष्काळ्या काळे (वय २०, रा. धावडेवस्ती, खोरवडी दौंड तालुका दौंड जिल्हा पुणे) यास पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला जेरबंद करण्यात यश आले आहे.

    दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीस गेलेला मोबाईल चोरी करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी दौंड पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सापळा रचून परश्या काळे यास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना कळवून खोरवडी येथून ताब्यात घेतले आहे. त्याने दोन गुन्हे केल्याची ही कबुली पोलीसांना दिली आहे. पोलीसांनी मुद्देमाल जप्त केला असून त्यास पुढील तपासासाठी दौंड पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

    ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गावडे, पोलीस हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, राजू मोमीन,अतुल ढेरे, सहाय्यक फौजदार मुकुंद कदम आदींच्या पथकाने ही कारवाई केली.