भाजपकडून महाविकास आघाडीत फूट पाडण्याचा प्रयत्न; विश्वजित कदम यांचा आरोप

सध्या राज्यातील राजकारणामध्ये (Maharashtra Politics) काय होईल सांगता येत नाही. कोण कधी शपथ घेईल, हे माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 'अ' व 'ब' टीम कोणती? हे अजून कळालेच नाही. भाजप मविआमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचा आरोप आमदार डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला.

    सांगली : सध्या राज्यातील राजकारणामध्ये (Maharashtra Politics) काय होईल सांगता येत नाही. कोण कधी शपथ घेईल, हे माहीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ‘अ’ व ‘ब’ टीम कोणती? हे अजून कळालेच नाही. भाजप मविआमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचा आरोप आमदार डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी केला.

    आटपाडी तालुक्यात काँग्रेसच्या वतीने जनसंवाद यात्रा झाली. नेलकरंजी ते खरसुंडी पदयात्रा काढण्यात आली. खरसुंडी येथे पदयात्रेनंतर आयोजित सभेत आमदार डॉ. कदम बोलत होते. कदम म्हणाले, ‘केंद्र शासनाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे. धनगर, मराठा आरक्षण, मराठा बांधवांना मारहाण, वारकऱ्यांवर लाठीचार्ज असे उद्योग केले जात आहेत. खासदार तुमच्याजवळ येत आहेत. बाकी काम शून्य असणारे खासदार आहेत. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही कमी पडलो म्हणूनच तुम्ही दुसऱ्याला निवडून दिले. मात्र, यापुढे कमी पडणार नाही’.

    तसेच मराठा, धनगर आरक्षणाप्रश्नी सत्ताधाऱ्यांनी फसवणूक केल्याची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणारा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा. मराठा आणि धनगर समाजाला न्याय देण्याची भूमिका काँग्रेसची कायम आहे.