एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न; अल्पवयीन मुलासह दोघे ताब्यात

    पिंपरी : स्क्रूड्रॉव्हर च्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पिंपरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. हि घटना शुक्रवारी (दि.24) रात्री पिंपरीतील संत तुकाराम नगर य़ेथील एसबीआयबँकेच्या एटीएम मध्ये घडला आहे.

    पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद

    रोहित विजय बहादूर सिंग (23 रा.महेशगंज, उत्तरप्रदेश) याला अटक केली असून एका अल्पवयीन मुलाला ताब्यत घेतले आहे. याप्रकरणी भगवंत ओमप्रकाश मुळे (25 रा. मोशी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    दोन्ही आरोपींना अटक

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे संत तुकाराम नगर येथली एसबीआय बँकेच्या एटीएम मध्ये गेले व त्यांनी स्क्रूड्राव्हरच्यासहाय्याने व लोखडी पट्टीने मशीन खोलण्याचा प्रयत्न करत होते. मात्र घटना स्थळी पोलीस पोहचली व त्यांनी रंगेहात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. याचा पुढील तपास पिंपरी पोलीस करत आहेत.