An attempt to end the BJP in Kalyan by father and son; Shiv Sena youth leader Aditya Thackeray comments on the condition of BJP activists

  कल्याण : इकडे गद्दार खासदार आहेत. ते स्वत: सीट बदलण्याची चर्चा आहे. इथू लढू तर द्या. कोणीही समोर असेल तरी एव्हढी महाशक्ती मागे आहे तर एव्हढा कशाचा विचार करतात. भाजप इथे काय करणार. इतके अत्याचार त्यांच्यावर आहे. गेल्या दोन वर्षात पद मिळाल्यानंतर पिता पुत्राकडून भाजपला संपविण्याचा प्रयत्न झालेला आहे. भाजपची अशी हालत होईल आणि ते सहन करतील. हे मला कधीच वाटले नव्हते. मला इथल्या भाजप कार्यकत्याविषयी वाईट वाटते अशी खंत शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी येथे व्यक्त केली.

  कल्याणमधील शिवसेना शाखेला भेट

  कल्याण पूर्वेतील शिवसेना कोळसेवाडी शिवसेना शाखेला युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी द्वारली येथील जागेच्या वादातून शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. या धक्कादायक घटनेच्या पार्श्वभूमीवर युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कल्याणमधील शिवसेना शाखेला भेट दिली. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी त्यांचे जाेरदार स्वागत केले. यावेळी ठाकरे काय भाषण करतात कोणावर टिका करतात. हे ऐकण्यासाठी शिवसैनिकांनी एकच गर्दी केली होती.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका

  गुंडांच्या गॅंग लिडर हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. ते त्यांना वाचवित आहेत. महाराष्ट्राचा हाच प्रा’ब्लेम आहे. मुख्यमंत्री हे पहिले शेतकरी आहेत. जे लूनार शेती करतात. आमवश्या आणि पौर्णिमेला शेती करतात. त्यांचे काय काय कुठे कुठे हे आम्ही कसे सांगू शकतो अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे यांनी केली आहे.

  खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका

  कल्याण लोकसभेतून तुम्ही लढून दाखवा असे आव्हान तुम्हाला खासदार शिंदे यांनी केले होते याविषयी विचारणा केली असता ठाकरे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला द्यायचे नसते. आज मला कोल्ड का’फीची आठवण झाली. त्यामुळे कल्याणमध्ये आली. आम्ही सत्यासाठी लढतो. लोकतंत्रासाठी लढताहेत. त्यांना हैराण केले जात आहे असे ठाकरे यांनी सांगितले.