Attempted murder by attacking own father with a sharp weapon with the help of a friend

पुढील तपास दराटी पोलीस स्टेशन करीत आहे. मुलगा अनिकेत आडे व त्याचा मित्र सुशील नारायण जाधव त्यांच्याविरुद्ध भांदवी कलम ३०७, ३४ नुसार दराटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. अनिकेत आडे याला न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग उमरखेड यांच्या कोर्टात पोलिसांनी हजर केले असून दुसरा आरोपी सुशील जाधव यांचा शोध घेणे सुरू आहे.

    ढाणकी : कौटुंबिक कलहातून मुलाने आपल्या मित्राच्या मदतीने वडिलांवर धारदार शस्त्रांनी (Sharp weapons) प्राणघातक हल्ला (Assault) करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला. ही मन हेलावून टाकणारी घटना उमरखेड तालुक्यातील (Umarkhed Taluka) मौज घमापूर येथे घडली. त्यामुळे, सर्वत्र परिसरात खळबळ उडाली आहे.

    विलास पांडू आडे ( ५०) असे जखमी झालेल्या वडीलांचे नाव आहे. तर अनिकेत आडे त्याचा मित्र सुशील नारायण जाधव असे प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. घटनेनंतर विलास आडे यांच्या पत्नीने ११२ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून दराटी पोलीस स्टेशनला (Darati Police Station) सदर माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी विलास यांना उपचारासाठी यवतमाळ ( yavatmal ) येथे रवाना केले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मुलाने वडिलावर हल्ला नेमका का केला ? त्याचे अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही.

    पुढील तपास दराटी पोलीस स्टेशन करीत आहे. मुलगा अनिकेत आडे व त्याचा मित्र सुशील नारायण जाधव त्यांच्याविरुद्ध भांदवी कलम ३०७, ३४ नुसार दराटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केला आहे. अनिकेत आडे याला न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग उमरखेड (Magistrate First Class Umarkhed) यांच्या कोर्टात पोलिसांनी हजर केली असून दुसरा आरोपी सुशील जाधव यांचा शोध घेणे सुरू आहे. सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पडावी (Police officer Pradeep Padavi) यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार भरत चपाईतकर, पोलीस उपनिरीक्षक राहुल गुहे करत आहेत.