उमेश कोल्हेंप्रमाणे नगरमध्ये हत्येचा प्रयत्न; हल्ल्यानंतर नितेश राणेंचा इशारा

नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे; पण वारंवार या प्रकरणाला पुढे करत हिंदूंवर हल्ले होत असतील तर आमचेही हात बांधलेले नाहीत, असा इशाराही नितेश राणे यांनी केला आहे. आता महाविकास आघाडी सरकार राहिले नाही, आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक राहिले नाही, त्यामुळे लवकर हे हल्ले बंद करावेत; नाहीतर जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

    मुंबई : नुपूर शर्मा यांचे समर्थन (Nupur Sharma Support) केल्याप्रकरणी देशात हिंदुंची हत्या (Hindu Murder) केली जात आहेत, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. अमरावतीचे उमेश कोल्हे (Umesh Kolhe Murder) यांची याच प्रकरणातून हत्या करण्यात झाली. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतमध्ये एका हिंदू युवकावर हल्ला (Attack On Hindu) करण्यात आला असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

    नुपूर शर्मा हा विषय बंद झाला आहे; पण वारंवार या प्रकरणाला पुढे करत हिंदूंवर हल्ले होत असतील तर आमचेही हात बांधलेले नाहीत, असा इशाराही नितेश राणे यांनी केला आहे. आता महाविकास आघाडी सरकार राहिले नाही, आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक राहिले नाही, त्यामुळे लवकर हे हल्ले बंद करावेत; नाहीतर जशास तसे उत्तर दिले जाईल, असेही राणे म्हणाले.

    देशात हिंदू देवदेवतांची विटंबना केली जाते, हिंदूंवर हल्ले केले जातात. असे हल्ले आता खपवून घेतले जाणार नाहीत. आम्ही कोणत्या धर्माच्या विरोधात किंवा त्यांच्या देवीदेवतांच्या विरोधात नाहीत. त्यामुळे हल्ले थांबले नाहीत तर आम्हालाही तिसरा डोळा उघडावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.