मैत्रिणीच्या कारणावरून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न; रास्ता पेठेतून मुंढव्यात घेऊन गेले अन्…

मैत्रिणीच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्याला रास्ता पेठेतून मुंढव्यात नेऊन मारहाण करण्यात आली.

    पुणे : मैत्रिणीच्या कारणावरून सराईत गुन्हेगाराने साथीदाराच्या मदतीने तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. त्याला रास्ता पेठेतून मुंढव्यात नेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सोहेल सलीम मुल्ला (वय २२, रा. विमाननगर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचा साथीदार फरार असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याप्रकरणी अभिषेक गायकर (वय ३०) याने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याघटनेत अभिषेक जखमी झाला आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, सोहेल आणि अभिषेक एकमेकांना ओळखतात. दरम्यान, अभिषेकला सोहेलची एक मैत्रिण बोलत असल्याचा संशय होता. त्यावरून त्यांच्यात वाद झाले. वादानंतर रात्री अभिषेकला रविवार पेठेत गाठून दोघांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यानंतर दुचाकीवरून मुंढवा येथील कुंभारवाडा चौक येथे नेले.

    तसेच, त्याठिकाणी बेल्टने बेदम मारहाण केली. तो खाली पडल्यानंतर आरोपीने त्याच्या डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने अभिषेक बाजूला झाल्याने तो बचावला. त्यानंतर आरोपी तेथून गेले. त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यास बघून घेण्याची धमकीही दिली. पुढील तपास उपनिरीक्षक माने करत आहेत.