मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न, नांदेडमधील कुटुंबाचा अंगावर रॉकेल ओतून केला आत्महत्येचा प्रयत्न

नांदेडमधील राजून चिनाप्पा मुरगुंडे हे आपल्या मागण्यासाठी उपोषण करत होते. पण त्यांची कोणी दखल घेतली नाही. राजून चिनाप्पा मुरगुंडे हे मागील 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागावर त्यांचा आक्षेप होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपण करत असलेले उपोषण कोणी गांभीर्यानं घेत नसुन आपली कोणी दखल घेत नाही म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. मंत्रालयासमोर आज दुपारच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा  प्रयत्न केला.

    मुंबई : मागील दोन तीन वर्षात किंवा कोरोना कालावधीत मंत्रालयासमोर किंवा मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रकार बंद झाला होता. पण आता मंत्रालयासमोर एका कुटुंबाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला तो व्यक्ती नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येत असून त्याचे नाव राजू चिनाप्पा मुरगुंडे असं आहे.

    दरम्यान, नांदेडमधील राजून चिनाप्पा मुरगुंडे हे आपल्या मागण्यासाठी उपोषण करत होते. पण त्यांची कोणी दखल घेतली नाही. राजून चिनाप्पा मुरगुंडे हे मागील 8 महिन्यांपासून उपोषण करत होते. सार्वजनिक बांधकाम विभागावर त्यांचा आक्षेप होता. बांधकाम विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपण करत असलेले उपोषण कोणी गांभीर्यानं घेत नसुन आपली कोणी दखल घेत नाही म्हणून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. मंत्रालयासमोर आज दुपारच्या सुमारास त्यांनी अंगावर रॉकेल ओतून मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा  प्रयत्न केला.

    या घटनेमुळं मंत्रालयासमोर खळबळ उडाली. तसेच पोलिसांची सुद्धा तारांबळ उडाली. तात्काळ पोलिसांनी प्रसंगावधान दाखवून घटनास्थळी धाव घेत राजू चिनाप्पा मुरगुंडे यांना ताब्यात घेतलं आहे. वेळीच पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत राजू मुरगुंडे यांना रोखले आणि ताब्यात घेतले त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. राजू मुरगुंडे यांना उपचारसाठी डॉक्टरकडे नेले असून, पुढील तपास पोलीस करताहेत.