राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अतुल राऊत यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मावळ तालुक्यातील अतुल चंद्रकांत राऊत यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे शुभहस्ते गोविंदबाग बारामती येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.

    वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मावळ तालुक्यातील अतुल चंद्रकांत राऊत यांची निवड नुकतीच करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे शुभहस्ते गोविंदबाग बारामती येथे नियुक्ती पत्र देण्यात आले.

    यावेळी पुणे जिल्हा मुख्य संघटक संजय जकाते, महिला उपाध्यक्ष स्वप्ना लोणकर, मुळशी तालुकाध्यक्ष बाळासाहेब झोरे,मावळ तालुकाध्यक्ष मंगेश खैरे, उपाध्यक्ष सोमनाथ धोंगडे, बाळासाहेब खंडागळे, शहराध्यक्ष मयुर गुरव आफताब सय्यद, बाळासाहेब शिंदे,बारकु ढोरे, विशाल वहिले,अरूण वाघमारे, प्रथमेश घाग,आदी जण उपस्थित होते.

    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजजी राजापुरकर ,पुणे जिल्हाध्यक्ष जगन्नाथजी शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या जोमाने पुन्हा जिल्ह्यावर काम करण्याची संधी मिळाली.साहेब प्रत्येकाची आपुलकीने विचारपूस करत असताना ८३ वर्षाच्या योध्याचे चेहऱ्यावरील तेज म्हणजे एक मोठी शक्तीच याचा प्रत्यय आला, तळागाळातील सर्व सामान्यांचे प्रश्न अडचणी सोडवून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार केला

    - अतुल राऊत, नवनिर्वाचित ओबीसी पुणे जिल्हाध्यक्ष