मुंबई पाठोपाठ औरंगाबादेत गोवरचा शिरकाव; प्रशासनाकडून विशेष खबरदारी

    मुंबईनंतर आता औरंगाबाद जिल्ह्यात गोवरने तोंड वर काढलयं. दोन बालकांचा गोवरचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. तरी परिसरात अनेक संशयित रुग्ण देखील आढळून आले आहेत. त्यापैकी चौदा बालकांची गोवर चाचणी केली असता दोन बालकांना गोवरची लागण झाली आहे. पण तरीही ८ बालकांचा रिपोर्ट अजूनही आलेला नाही तरी रुग्णसंख्येत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पालकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. प्रशासनाकडून आवश्यक त्या सुचना दिल्या आहे तसेच भीती बाळगण्यापेक्षा योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. गोवरची लागण झालेल्या एका बालकाचं वय ७ वर्ष तर दुसऱ्याचं ११ वर्ष आहे.

    कारण दिवसेनदिवस रुग्ण संख्येत वाढ बघायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्य आरोग्य मंत्रालयास विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. तरी औरंगाबादकरांनी काळजी घ्यावी आणि आपल्या पाल्याचे तातडीने लसीकरण करावे.