औरंगाबादचे संभाजीनगर नामकरणाचा वाद उच्च न्यायालयात, १ ऑगस्टला सुनावणी

औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव यासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

    मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण (Aurangabad Name Change Sambhaji Nagar) करण्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर १ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या (Osmanabad) नामांतराचा निर्णय महाविकास आघाडीने (MVA) शेवटच्या कॅबिनेट बैठकीत (Cabinet Meeting) घेतला होता. तो निर्णय शिंदे सरकारने रद्द केला आणि चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, १६ जुलै रोजी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत शहराच्या नामांतराचा निर्णय पुन्हा घेण्यात आला आहे.

    औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव (Dharashiv) यासह नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.

    औरंगाबादचे नाव संभाजीनगर करा, या मागणीवरून सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. याच मुद्द्यावरून गेल्या ३४ वर्षांपासून अनेकवेळा संघर्ष निर्माण झाले. मात्र, संभाजीमहाराजांचे नाव देण्याचीच मागणी का केली गेली. याचे उत्तर बहुतांश लोकांना माहित नाही. शिवसेना म्हणते हा याच शहरात संभाजी महाराजांचे हाल करून त्यांना मारण्यात आले, त्यामुळे शहराला त्यांचे नाव द्यावे. तर दुसरीकडे महाराज फक्त दोनदा शहरातून गेले त्यांना मारल्याचे पुरावे नाहीत, असे इतिहास तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ठाकरे सरकारने नामांतराचा निर्णय घेतला त्यानंतर नावावरुन विरोध सुरु झाला आहे.

    औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदल करणे म्हणजे एक बैठक घेऊन ठराव संमत करणे असे होत नाही. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांचा खर्च आहे, असा दावा औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांनी केला होता. हा दावा खरा असून त्यासाठी लागणारी किंमत सध्या ठरवणे शक्य नाही. कारण त्यासाठी अनेक ठिकाणी बदल करावे लागतात, अस मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे (Dr. Satish Dhage) यांनी व्यक्त केले आहे.