औरंगाबाद-उस्मानाबाद नामांतराचे राज्यात पडसाद; एमआयएमची नाराजी

    औरंगाबाद – मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बुधवारी औरंगाबादचे संभाजीनगर (Sambhaji Nagar), उस्मानाबादचे धाराशिव (Dharashiv) आणि नवी मुंबई विमानतळाचे (Navi Mumbai Airport) ‘लोकनेते स्व. दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नामकरण केले. याचे राज्यभरातून स्वागत (Welcome) करण्यात येत आहे. तर काही संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.

    मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला त्यांचा मी खूप आभारी आहे, असे मत औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)  यांनी व्यक्त केले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न आज पूर्ण झाले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरचा जो निर्णय घेतला या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अनेक वर्षापासून या निर्णयाची वाट शिवसैनिकांनी औरंगाबादचे नागरिक पाहत होते, असे ते म्हणाले.
    तर, काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी (NCP) मंत्र्यांना लाज वाटत असेल तर आजच राजीनामे द्या, अशी नाराजी खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली.

    राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्र्यांनी औरंगाबाद, उस्मानाबादच्या नागरिकांसोबत गद्दारी केली आहे, खूर्ची वाचवण्यासाठी हा त्यांचा खेळ असून, त्यांना लाज वाटत असेल तर त्यांनी आजच राजीनामे द्यावेत, असेही खासदार जलिल म्हणाले. दरम्यान, उस्मानाबादचे धाराशिव नामांतर ठरावामुळे शिवसैनिकांनी पेढे वाटून, फटाके फोडत आनंदोत्सव साजरा केला. तर, मिरजमध्ये एमआयएमने मंत्री विश्वजित कदम यांच्या पोस्टरला जोडे मारले.