Aurangabad Pimpal Purnima celebration of wife victim male congregations

गेल्या सात ते आठ वर्षापासून औरंगाबाद जवळील असलेल्या पत्नीपीडित आश्रमात वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी पिंपळ पौर्णिमा साजरी करण्यात येते. पत्नीच्या जाचाने पीडित असलेली पुरुषमंडळी पिंपळाला साकडे घालून पिंपळ पौर्णिमा साजरी करतात(Pimpal Pournima celebration of wife victim male congregations).

    यावर्षीही वट पौर्णिमेच्या पूर्व संध्येला मुन्जाला साकडे घालत ‘ हे मुंजा हे यमराजा उद्या आमच्या बायका येऊन तुला खोटे साकडे घालतील त्यामुळे त्यांचे काही एक ऐकू नकोस अशा बायकांच्या ताब्यात जाण्या पेक्षा तुझाच सहारा चांगला ‘भांडखोर बायका आम्हाला सात जन्म तर काय पण सात सेकंद देखील नको असे म्हणत पत्नी पिडीतांनी आज ‘पत्नी पिडीत पुरुष आश्रमात एकत्र येऊन पिंपळ पौर्णिमा साजरी केली.

    यावेळी आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके, पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मणाळ, चरणसिंग गुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड, बनकर, नाटकर, कांबळे आदी पत्नी पिडीत व सह पिडीत मोठ्या संखेने उपस्थित होते.