“सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब पहिला राजा होता…”, ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड, औरंगजेबाच्या राण्यांना…

सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब हा पहिला राजा होता, तसेच दुसऱ्या बाजीरावाचा अपवाद वगळता बाकीचे पेशवे हे विलासी होते. तसेच ते फक्त दुष्ट नव्हते तर नीच होते, असं वक्तव्यही 'कोसला'कार भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे.

    मुंबई – महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून औरंगजेबवरुन (aurangzeb) मोठा वाद सुरु आहे. औरंगजेबचे मोबाईल स्टेटस, फोटो झळकवले म्हणून वादंग निर्माण झाला असताना, आता औरंगजेबवरुन ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि लेखक भालचंद्र नेमाडे (Bhalchandra Nemade) यांनी खळबळजनक व वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळं नव्या वादाच्या ठिणगीला सुरुवात झाली आहे. सतीप्रथा बंद करणारा औरंगजेब हा पहिला राजा होता, तसेच दुसऱ्या बाजीरावाचा अपवाद वगळता बाकीचे पेशवे हे विलासी होते. तसेच ते फक्त दुष्ट नव्हते तर नीच होते, असं वक्तव्यही ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. ‘मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालया’तर्फे मुंबईतील दादरमध्ये शतकोत्तरी रौप्य महोत्सवी सांगता समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. (Aurangzeb was the first king to stop the practice of sati…”, facing a new controversy due to the controversial statement of senior writer Bhalchandra Nemade)

    औरंगजेबाच्या २ राण्यांना पंडितांनी भ्रष्ट केलं

    दरम्यान, पुढे बोलताना भालचंद्र नेमाडे म्हणाले की, काशी विश्वेशराला गेलेल्या औरंगजेब बादशाहच्या राण्यांना तेथील हिंदू पुजाऱ्यांनी भ्रष्ट केलं. ही गोष्ट जेव्हा औरंगजेबाला कळाली तेव्हा त्याने काशी विश्वेश्वराची तोडफोड केली, असंही  भालचंद्र नेमाडे यांनी म्हटले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून औरंगजेब मुद्द्यांवरून सर्वाधिक वाद होतोय.  भालचंद्र नेमाडे यांनी केलेल्या या खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्यामुळं नवा वाद होण्याची शक्यता आहे.

    पेशवे हे विलासी होते…

    यावेळी नेमाडे यांनी खरा इतिहास वाचा असा सल्ला देखील उपस्थितांना दिला. त्यावेळी जे पेशवे होते, ते सगळे दुष्टच नाही तर नीच वृत्तीचे होते. तसेच ते फार विलासी होते. दुसरा बाजीराव हा फार मोठा माणसू होता. पेशव्यांच्या तावडीतून त्यांनी या राष्ट्राला वाचवलं आणि इंग्रजांकडे सोपवलं. हा इतिहास मला इतिहासकार वा.सी. बेंद्रे यांनाही सांगितला आहे. गोविंदपंत बुंदेले कोणतरी तिकडे पंजाबात होता. त्याला या दिवशी मी अमुक तमुक ठिकाणी येतोय. आठ ते दहा वर्षांच्या दोन सुंदर मुली तयार ठेवाव्यात. असं नानासाहेब पेशव्यांचं पत्र यायचं. हे पत्र मी वाचलं असल्याचा दावाही नेमाडेंनी केला आहे. नेमाडेंच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं नवा वाद होण्याची शक्यता आहे.