mumbai metro taxi and auto rickshaw

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जानेवारीला अंधेरी ईस्ट ते दहिसर ईस्ट आणि अंधेरी वेस्ट ते दहिसर वेस्ट या मेट्रो सेवेचे उद्धाटन केले. या दोन्ही मार्गांवर मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाखो मुंबईकर मेट्रो-2ए आणि मेट्रो-7 च्या सुविधेचा (Mumbai Metro) लाभ घेत आहेत.

  मुंबई: मुंबईत मेट्रो (Mumbai Metro) पहिल्यांदा 2014 मध्ये घाटकोपर ते वर्सोवादरम्यान धावली. त्यावेळी लोकांना या गोष्टीची कल्पना नव्हती की मेट्रोला ते पुढे इतकं प्राधान्य देतील. सुरुवातीच्या दिवसांमध्ये लोक मेट्रोने प्रवास करायचा कचरत होते. कारण मेट्रोच्या तिकीटाचे दर तेव्हा जास्त होते. मुंबईकरांना प्रवासासाठी जास्त पैसे खर्च करण्याची सवय नसल्याने ते पैसे त्यांना जास्त वाटायचे. लोकल आणि मेट्रोच्या तिकीट दरांची तुलना करता ते दर जास्त होते. घाटकोपर ते सीएसटी प्रवासासाठी लोकलला जितके पैसे लागतात तितके मेट्रोच्या एका स्थानकावर जाण्यासाठी लागायचे.

  मेट्रोचा आरामदायक प्रवास, रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा वाढला त्रास
  हळुहळू मुंबई मेट्रोची सुविधा, फ्रिक्वेन्सी आणि एसीचा आरामदायक प्रवास लोकांना आवडायला लागला. घाटकोपर ते वर्सोवा प्रवास करण्यासाठी दोन तासांपेक्षा जास्त वेळ लागायचा. तो प्रवास फक्त 30 मिनिटांमुळे शक्य झाला तो मेट्रोमुळे. त्यामुळे लोकांना मेट्रो आवडू लागली. हे सगळं सुरु असताना मेट्रोला तर लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला पण या भागातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालवणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली. परिस्थिती इतकी वाईट झाली की त्यांना प्रवासी मिळणं कठीण होऊ लागलं. याचं सगळ्यात मोठं कारण हे होतं की, मेट्रो ट्रेनमध्ये प्रवासी न थकता, ट्रॅफिकमध्ये न अडकता कुठेही पोहोचत होता. आता अशीच अवस्था मुंबई मेट्रोच्या फेज टूमध्ये पाहायला मिळत आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जानेवारीला अंधेरी ईस्ट ते दहिसर ईस्ट आणि अंधेरी वेस्ट ते दहिसर वेस्ट या मेट्रो सेवेचे उद्धाटन केले. या दोन्ही मार्गांवर मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लाखो मुंबईकर मेट्रो-2ए आणि मेट्रो-7 च्या सुविधेचा लाभ घेत आहेत. आज दहा वर्षांनंतर या दोन मार्गांजवळच्या परिसरातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना त्याच समस्येला तोंड द्यावं लागत आहे.

  रिक्षा आणि टॅक्सी चालकांचं म्हणणं आहे तरी काय ?
  प्रवासी संख्या कमी झाल्याचं रिक्षा आणि टॅक्सी चाल‌वणाऱ्यांच म्हणणं आहे. बहुतेक लोक हायवेवर आणि लिंक रोडवर मेट्रो प्रवासाला प्राधान्य देत आहेत. या व्यतिरिक्त मेट्रो स्टेशनवरून खाली उतरल्यानंतर स्टेशनवरून घरी जाताना लोक चालत जात आहेत किवा स्वत:च्या गाडीने जात आहेत. त्यामुळे आमची समस्या वाढली आहे. प्रवासी मिळाले नाही तर आम्हाला पैसेच मिळणार नाहीत आणि आम्हाला घर चालवणंसुद्धा अवघड होईल, असे रिक्षा आणि टॅक्सी चालक म्हणतात.

  एलप्पा धुत्रे हे 33 वर्षीय गृहस्थ सांगतात की, याआधी मला नेहमी लांब पल्ल्याची भाडी मिळायची. गुंदावली, कांदिवलीसाठी मला भाडं मिळायचं. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून मेट्रो सुरु झाल्याने कमाई अर्ध्यावर आली आहे. मी पुर्वी दुपारी 2 वाजेपर्यंत 600 रुपयांच्या आसपास कमवायचो मात्र आता 300 रुपये कमवणंदेखील अवघड झालं आहे. मी आता एक नोकरी शोधण्याचा विचार करतोय. अशीच परिस्थिती कायम राहिली तर 50 वर्षीय सभाजीत यादव यांनाही घर चालवणं अवघड होणार आहे. मेट्रोमुळे कमाई होत नसल्याचं त्यांनी सांगितलं.