Breaking : कुठं फेडाल हे पाप! सत्तेवर येताच मुंबईकरांच्या खिशावर मारणार डल्ला ; लवकरच निघणार आहे फतवा, पडणार आहे एवढा ‘भार’

टॅक्सीचे किमान भाडे तीन रुपये तर रिक्षा भाडे दोन रुपयांनी वाढवण्यास या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून भाडेवाढीला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला जातो.

  • रिक्षा, टॅक्सीचा प्रवास महागणार, १ ऑक्टोबरपासून नवीन भाडेवाढ लागू

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क

रिक्षा आणि टॅक्सीच्या प्रवासदरात भाडेवाढ (Auto Taxi Fare Hike) होणार असून यामुळे सर्वसामान्यांचा प्रवास महागणार (Travel Expensive) आहे. टॅक्सीचे किमान भाडे २५ रुपयांवरुन २८ रुपये आणि रिक्षाचे भाडे २१ रुपयांवरुन २३ रुपये होणार आहे. येत्या १ ऑक्टोबरपासून ही भाडेवाढ लागू होणार असून या निर्णयावर सोमवारी शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे (This fare hike will be implemented from October 1 and it is likely that this decision will be final on Monday).

रिक्षा, टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींची आज मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत बैठक झाली. परिवहन विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन या बैठकीला उपस्थित होते.

टॅक्सीचे किमान भाडे तीन रुपये तर रिक्षा भाडे दोन रुपयांनी वाढवण्यास या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. मुंबई महानगर प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून भाडेवाढीला मंजुरी देण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे आज झालेला निर्णयावर सोमवारी होणाऱ्या एमएमआरटीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने वाढलेल्या सीएनजी दरामुळे टॅक्सी भाडेदरात दहा तर रिक्षा भाडेदरात पाच रुपये वाढ करून मागितली होती. यासाठी टॅक्सीमेन्स युनियनने संपाची हाक दिली होती. परंतु, भाडेदर निश्चित झाल्याने संप मागे घेत असल्याची माहिती युनियनचे सरचिटणीस क्वाड्रोस यांनी दिली.

या बैठकीत रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.