संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस चांगलाच (Heavy Rain) बरसत आहे. त्यामध्ये राज्यात पावसाने धुव्वाधार बॅटिंग करत सर्वांनाच दिलासा दिला आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात राज्याची सरासरी 994.5 मिमी असताना 965.7 मिमी पाऊस झाला आहे.

    धाराशीव : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेला पाऊस चांगलाच (Heavy Rain) बरसत आहे. त्यामध्ये राज्यात पावसाने धुव्वाधार बॅटिंग करत सर्वांनाच दिलासा दिला आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात राज्याची सरासरी 994.5 मिमी असताना 965.7 मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा केवळ तीन टक्के कमी पाऊस झाला. पण सांगलीत सरासरीपेक्षा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

    महाराष्ट्रातील काही भागांत चांगला पाऊस झाला असला तरी राज्यातील नऊ जिल्ह्यांची स्थिती चिंताजनक असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. यात सांगलीमध्ये सरासरीच्या 44 टक्केच पाऊस झाला आहे. सांगलीमध्ये सरासरी 486.1 मिमी पाऊस पडतो. यंदा केवळ 272.7 मिमी पाऊस झाला. सांगलीच्या पश्चिम शिराळा, वाळवा तालुक्यात चांगला पाऊस झाला असला तरी भागात कमी पाऊस पडल्यामुळे दुष्काळसदृश स्थिती आहे.

    कोकण विभागात 2870.8 मिमी सरासरी पाऊस पडतो. यंदा 11 टक्के जास्त 3177.6 मिमी पाऊस झाला. मात्र, रत्नागिरीत 2 टक्के कमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्रात 12 टक्के तर मराठवाड्यात 11 टक्के कमी पाऊस झाला आहे. विदर्भात 2 टक्के पावसाची तूट आहे. सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा 37 टक्के तर सोलापुरात सरासरीपेक्षा 30 टक्के कमी पाऊस पडला.