Avoid pre-monsoon cotton cultivation, appeal of Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University

ओलिताची‎ व्यवस्था असणारे शेतकरी मे‎ महिन्यातच कपाशी लागवड‎ करतात. त्यासाठी अनेकजण‎ परराज्यातून बियाणे आणतात. मात्र‎, ‎बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे कारण‎ सांगत कृषी विभागाने मान्सूनपूर्व‎ पेरणीवर निर्बंध आणले आहेत.‎ बोंडअळीला रोखण्यासाठी एक‎ जूनपासूनच कापूस बियाणे विक्री‎ करण्याचे आदेश कृषी‎ आयुक्तालयाने दिले आहेत.

  अकोला : कपाशीवर ‎वाढत असलेल्या बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचा खर्च वाढून उत्पन्नात घट होत आहे. त्यामुळे ‎मान्सूनपूर्व कपाशी लागवड प्रकर्षाने ‎टाळा, असे आवाहन डॉ.‎ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व ‎कृषी विभागाने केले आहे.‎ जिल्ह्यात कपाशीचे सरासरी क्षेत्र‎ १ लाख ५५ हजार हेक्टरच्या‎ जवळपास असते. यंदा कापसाला‎ मिळालेल्या भावामुळे कापूस पेरणी‎ जास्त राहणार आहे.

  ओलिताची‎ व्यवस्था असणारे शेतकरी मे‎ महिन्यातच कपाशी लागवड‎ करतात. त्यासाठी अनेकजण‎ परराज्यातून बियाणे आणतात. मात्र‎, ‎बोंडअळीच्या प्रादुर्भावाचे कारण‎ सांगत कृषी विभागाने मान्सूनपूर्व‎ पेरणीवर निर्बंध आणले आहेत.‎ बोंडअळीला रोखण्यासाठी एक‎ जूनपासूनच कापूस बियाणे विक्री‎ करण्याचे आदेश कृषी‎ आयुक्तालयाने दिले आहेत. त्यामुळे‎, किरकोळ विक्रेत्याकडून‎ शेतक-यांना कापूस‎ बियाणे पेरणीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.‎

  यंदा बाजारात कपाशीचे भाव‎ तेजीत आहेत. शिवाय खरीप हंगाम‎ कपाशीसाठी चांगला जाण्याची‎ शक्यता आहे. मान्सूनचे आगमन ही‎ लवकर होण्याचा अंदाज आहे.‎ त्यामुळे, यंदा कपाशीचे क्षेत्र वाढू‎ शकते.‎ जिल्हयात अकोट आणि तेल्हारा तालुक्यात यापूर्वी मोठ्या‎ प्रमाणावर मान्सूनपूर्व कपाशी‎ लागवड होत असे. मात्र, अलीकडे‎ जनजागृतीमुळे त्यामध्ये घट झाली‎ आहे. सद्यःस्थितीत तेल्हारा‎ तालुक्यात मान्सूनपूर्व कपाशी पेरणी‎ फारशी होत नसल्याचे चित्र आहे.

  कपाशी की सोयाबीन ?

  जिल्ह्यात सर्वाधिक कपाशी व सोयाबीनची लागवड शेतकरी करतात. यंदा कधी नव्हे ते ११ हजारांपर्यंत सोयाबीनचे भाव गेले होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर परत सोयाबीनचे भाव उतरले. त्यामुळे शेतकरी विचारात पडले. यापुढे कपाशीला प्राधान्य द्यायचे की सोयाबीनची लागवड करायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. एक जूनपासूनच कापूस ‎बियाणे विक्री करण्याचे आदेश ‎कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. ‎या आदेशाची जिल्ह्यातही काटेकोर ‎अंमलबजावणी आवश्यक असून, १ जूनपूर्वी कुणी कपाशीचे बियाणे ‎ विकल्याचे आढळल्यास ‎ विक्रेत्यांवर कारवाई करू. ‎

  – डॉ. कांताप्पा खोत, जिल्हा ‎ अधीक्षक कृषी अधिकारी