महिलांबाबतच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांचा माफीनामा; माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला

माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला. तरीही त्या शब्दाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा मागतो, असे असे बाबा रामदेव म्हणाले. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले, की मी नेहमी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने काम केले आहे. जेणेकरून महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळण्यास मदत व्हावी, असेही त्यांनी सांगितले.

    मुंबई – महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातले तरी चांगल्या दिसतात, असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी केले होते. या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी याप्रकरणी त्यांना नोटीसही पाठवली. यानंतर बाबा रामदेव यांनी महिला आयोगाच्या (Women Commission) नोटिशीला उत्तर दिले आहे.

    माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला. तरीही त्या शब्दाने कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा (Apology) मागतो, असे असे बाबा रामदेव म्हणाले. आपल्या पत्रात त्यांनी म्हटले, की मी नेहमी महिला सक्षमीकरणाच्या दिशेने काम केले आहे. जेणेकरून महिलांना समाजात समानतेचा दर्जा मिळण्यास मदत व्हावी, असेही त्यांनी सांगितले.

    महिलांचा अपमान करण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता. ठाण्यात आयोजित करण्यात आलेला संपूर्ण कार्यक्रम महिलांच्या सशक्तीकरणाशी संबंधित होता. कार्यक्रमातील काही सेकंदाची क्लिक सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली. ज्यामुळे माझ्या शब्दांचा चुकीचा अर्थ घेतला गेला. मात्र, तरीही कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी क्षमा मागतो, असे त्यांनी म्हटले आहे.