Baba Siddiqui will join our party tomorrow; Ajit Pawar clearly said

  पुणे : माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम करीत मिलिंद देवरा पाठोपाठ दुसरा झटका दिला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.  11 तारखेलादेखील अजून काही लोक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे विमानतळ येथील नवीन टर्मिनसची पाहणी केली.यावेळी त्यांनी आपल मत व्यक्त केलं.
  पुणे विमानतळावरून एक सिंगापूर आणि एक दुबई येथून विमाने
  यावेळी ते म्हणाले की राज्यात तसेच देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू आहेत. आज पुणे विमानतळ येथील नवीन टर्मिनलची पाहणी केली. या विमानतळासाठी गिरीश बापट यांनी खूप प्रयत्न केले होते. ऐतिहासिक गोष्टीने असलेले विमानतळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या विमानतळावर साधारण १ कोटी २० लाख लोकं ये जा करू शकतील आणि सध्या या विमानतळावर ३४ काउंटर आहेत.आत्ता या नवीन टर्मिनलमुळे पुण्यातील प्रवाश्यांना आता आरामदायी प्रवास होणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर एक सिंगापूर आणि एक दुबईला येथून विमाने जातात. तसेच, ज्योतिरादित्य सिंधिया यांनीदेखील याची पाहणी केली आहे. याला आत्ता जुने विमानतळ पण जॉईन केले जातील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सातारा मध्ये १९ तारखेला सातारा सैनिक शाळा तसेच विविध कार्यक्रम आहे.आणि आमचं नियोजन आहे की पुणे विमानतळाचे देखील उद्घाटन करण्यात यावं अस यावेळी अजित पवार म्हणाले.
  झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी
  काल ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर जी गोळीबार करण्यात आली त्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की ही घटना अतिशय चुकीच्या पद्धतीने घडलेली आहे. अशा पद्धतीच्या घटना राज्यात घडता कामा नये. पण आपण जर कालचा व्हिडिओ पहिला तर दोघेही गप्पा मारत आहे. त्यांचं संभाषण ऐकल तर दोघांचे मित्रत्वाचे संबंध आहे असेच वाटत आहे. त्यामुळे याचा योग्य तपास हा व्हायला पाहिजे, झालेली घटना ही अतिशय दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. अशा पद्धतीची घटना कुठेही घडता कामा नये. पण कालच्या प्रकरणात योग्य तो तपास हा व्हायला पाहिजे. विरोधक हे मोठ्या प्रमाणावर सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना ते निमित्त मिळालं आहे. पण खरी परिस्थिती ही समोर आली पाहिजे, असे यावेळी पवार यांनी सांगितले.
  पुण्यात पुणे पोलिसांनी गुंडांना बोलावून सोशल मीडिया गुंड रीलस टाकू नये अस सांगितलेलं असताना देखील रिलस टाकण्यात येत आहे यावर अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की आपले पोलीस आयुक्त आज नाशिक मध्ये आहेत.पुणे सी पी आणि पुणे ग्रामीण एस पी. यांना सूचना दिल्या आहेत.एवढं करून कोणाची मस्ती असेल तर त्याला पोलिसी खाक्या हे दाखवायला लागेल अस यावेळी अजित पवार म्हणाले.
  राज्यसभा बाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की भाजपच्या संदर्भात किती नावे पाठवायची हा त्यांचा अधिकार आहे.आम्हाला परवा आयोगाने निर्णय दिला आहे.आमच्याकडे पण सहकाऱ्यांनी मागणी केली आहे.आम्ही एकत्र बसून नाव फायनल करू अस यावेळी अजित पवार म्हणाले.
  पुण्यात पक्ष कार्यालयात कोनशिला वर असलेले नाव काढण्यात आलं त्याबाबत अजित पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की जेव्हा पाटी तोडली तेव्हा त्या व्यक्तीला अजित पवार ने महापौर केले.पक्षाचं अध्यक्ष केलं.तो पक्षाचा अध्यक्ष असताना त्याने राजीनामा देखील माझ्याकडे दिला होता.त्याचा राजीनामा माझ्याकडे अजूनही आहे.त्या व्यक्तीला शहराध्यक्ष देखील मीच केलं पण आत्ता त्याला योग्य जे वाटतं आहे तो ते करत असल्याचं यावेळी पवार म्हणाले.