भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर
भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर

दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ही चौकशी सुरू झाली आहे.

    औरंगाबाद – बबनराव लोणीकर यांच्याविरोधात अॅट्रोसिटीची (Atrocity) तक्रार दाखल झाली आहे. औरंगाबादच्या पोलीस आयुक्त कार्यालयात अॅट्रोसिटीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. औरंगाबाद शहरातील गुणरत्न सोनवणे आणि नागराज गायकवाड या दोन कार्यकर्त्यांनी अट्रासिटीची तक्रार दिली आहे. दलित समाजाचा अपमान केल्यामुळे अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, बबनराव लोणीकर यांच्या ऑडिओ क्लिप प्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या निर्देशानुसार ही चौकशी सुरू झाली आहे. एका अभियंत्याला शिवीगाळ करताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते, असा दलित कार्यकर्त्यांचा दावा आहे.