बबनराव पाचपुते यांची प्रकृती खालावली; तातडीने रुग्णालयात दाखल

आमदार बबनराव पाचपुते यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला गेला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तुर्तास त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

    नागपूर : माजी मंत्री तथा भाजप आमदार बबनराव पाचपुते (Babanrao Pachpute) यांची गुरुवारी अचानक प्रकृती खालावली. डॉक्टरांनी त्यांना विधान भवनातून रुग्णालयात हलवले आहे. बबनराव पाचपुते यांना आज दुपारी विधान भवनात श्वसनाचा त्रास (Respiratory Distress) सुरू झाला. सहकाऱ्यांनी त्यांना परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Primary Health Center) दाखल केले.

    पाचपुते यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला गेला. परंतु पाचपुतेंच्या विनंतीवरून त्यांना खासगी रुग्णालयात (Private Hospital) दाखल करण्यात आले आहे. तुर्तास त्यांची प्रकृती स्थिर (Condition Stable) असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.

    दरम्यान, बबनराव पाचपुते यांना रुग्णालयात दाखल करून रुग्णवाहिका परत विधान भवन परिसरात आली. मात्र, विधान भवनाच्या मागच्या दारातून आत येत असताना रुग्णवाहिकेचे मागचे एक चाक मलवाहिनीच्या चेंबरमध्ये फसले. उपस्थितांनी धक्का मारून तिला बाहेर काढले.