ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर…;ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांचा थेट इशारा

ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणारी भुमिका या अधिवेशनात सरकारने घेतली तर ओबीसी पेटून उठेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी दिला आहे.

    नागपूर – राज्य सरकारने आज मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) विधीमंडळाचे विशेष अधिवेशन (Maratha Reservation special session) बोलावले आहे. यामध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचे मसुद्यामध्ये नमूद करण्यात आले आहे. मराठा समाजाला शिक्षणामध्ये व सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. राज्यामध्ये (state government)  28 टक्के असलेल्या मराठा समाजासाठी हे विशेष अधिवेशन महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, यावर आता ओबीसी (OBC) नेत्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणारी भुमिका या अधिवेशनात सरकारने घेतली तर ओबीसी पेटून उठेल, ओबीसी रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे (Dr. Babanrao Tayawade) यांनी दिला आहे.

    ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण यामध्ये असलेला फरक काही वेळात विशेष अधिवेशनामध्ये लक्षात येईल. मराठा समाजासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनामध्ये 10 टक्के मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर होणार आहे. यावर ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. तायवाडे म्हणाले, “मंत्रिमंडळाने संमत केलेल्या विधेयकानुसार मराठा समाजाला 10 टक्के स्वतंत्र आरक्षण मिळणार आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात ज्या त्रुटी दाखवल्या त्या दूर करण्याचा प्रयत्न झाला आहे. मसुद्यानुसार, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. मराठा समाजाला न्यायालयाच्या कसोटीवर उतरणारे आरक्षण देणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.मराठा समाजाला १० टक्के आरक्षणाची शिफारस मागसवर्ग आयोगाने केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. आमच्या ओबीसी समाजाच्या २७ टक्के आरक्षणाला धक्का लागला नाही, यामुळे ही समाधान देणारी बाब आहे. परंतु मराठा समाजाची २८ टक्के लोकसंख्या असल्याचे आयोगाने म्हटले आहे. हा घोळ वाटतोय. या चिंतनाचा विषय आहे. शासनाने जातनिहाय जनगणना करुन कोणाची किती लोकसंख्या यांचे आकडे जाहीर करावी. सरकारने आम्हाला शब्द दिला होता. त्याची पुर्तता करावी.” अशी मागणी तायवाडे यांनी केली.

    ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देखील सल्ला दिला आहे. डॉ. तायवाडे म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे. परंतु त्यांनी ही भूमिका बदलायला हवी.” असा सल्ला त्यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. तसेच “आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही तर आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही. मंत्रिमंडळ बैठकीत संमत झालेला पूर्ण अहवाल आल्यावर आपण अभ्यास करुन बोलणार आहोत. सगे सोयऱ्याबाबत कायदा करण्यापूर्वी हरकती आणि सूचनांवर सुनावणी करण्यात यावी,” असे देखील ओबीसी नेते बबनराव तायवाडे म्हणाले आहेत.