यापुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही, अमरावतीच्या सभेत बच्चू कडुंचा रवी राणांना इशारा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा (Ravi Rana) यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची जाहीर माफी मागितली आहे. मात्र, या आरोेप प्रत्त्यारोपानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

    अमरावती : अमरावतीमध्ये आज आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या उपस्थितीत आज प्रहार संघटनेचा मेळावा होत आहे. आमदार रवी राणा यांच्या सोबत झालेल्य वादानंतर बच्चू कडू आपली भूमिका स्पष्ट करणार  अशी शक्यता वर्तवली जात होती. आज या मेळाव्याच्या सुरुवातीलाच त्यांनी विरोधकांनवर चांगलीच तोफ डागली. पहिली वेळ आहे म्हणुन माफ केलं यापुुढे आमच्या वाट्याला गेल्यास माफ करणार नाही असं म्हणत त्यांनी चांगलचं सुनावलं.

    मागील काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यात टोकाचा वाद सुरु होता. त्यावर आता पडदा पडला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत रवी राणा (Ravi Rana) यांनी जवळपास अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांची जाहीर माफी मागितली आहे. मात्र, या आरोेप प्रत्त्यारोपानंतर बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. रवी राणांना या आरोपाबाबत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले होते. तर यासाठी रवी राणांना एक नोव्हेंबरचा अल्टीमेटम दिला होता. तो अल्टीमेटम आज संपत आहे. अद्याप रवी राणांनी याबाबत कोणतेही पुरावे सादर केले नाहीत. फक्त दिलगिरी व्यक्त करत आपले शब्द मागे घेतले आहेत. त्यानंतर आज बच्चू कडू त्यांची भूमिका मांडली.