उस्मानाबाद जिल्हा परिषद आंदोलनप्रकरणी, बच्चू कडू यांना उस्मानाबाद न्यायालयाने ठोठावला ५ हजारांचा दंड

उस्मानाबाद जिल्हा परिषद आंदोलनप्रकरणी कडू यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं.

    उस्मानाबाद : प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आक्रमक आमदार अशी ओळख असलेले बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. 2019 मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषद आंदोलनप्रकरणी कडू यांना पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 2019 मध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये आंदोलन करण्यात आलं होतं, या आंदोलनादरम्यान वाद झाला होता. हे प्रकरण 14 जानेवारी 2019 पासून प्रलंबित आहे.

    दरम्यान, बच्चू कडू यांच्यासह अन्य तीन आरोपींना देखील दंड ठोठावला आहे. तर बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना उस्मानाबाद न्यायालयाने (Osmanabad Court) 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. जिल्हा परिषदेत आंदोलनादरम्यान वाद झाला होता, त्यानंतर कडू यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. बच्चू कडू कोर्टात हजर न झाल्याने उस्मानाबाद कोर्टाने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट काढले होते. सुनावणीला सातत्याने गैरहजर राहिल्याने उस्मानाबाद कोर्टाने बच्चू कडू यांना खडेबोल सुनावले आहेत.