राष्ट्रीय समाज पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी बालाजी पवार यांची निवड

बालाजी पवार गेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ पक्षाचे काम करीत असून महिलांसाठी शासकीय योजना, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले असल्याने त्यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड झाली असल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली.

    पुणे : बालाजी पवार गेल्या अनेक वर्षांपासून अधिक काळ पक्षाचे काम करीत असून महिलांसाठी शासकीय योजना, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम त्यांनी केले असल्याने त्यांची पुणे शहराध्यक्षपदी निवड झाली असल्याची माहिती, त्यांनी यावेळी दिली.

    दरम्यान सदर निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष काशीनाथ नाना शेवते यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी महासचिव माऊली सलगर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, पुणे ज़िल्हा संपर्क प्रमुख अंकुश देवडकर, व किर्वे ताई तसेच मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.

    भविष्यात राष्ट्रीय समाज पक्ष वाढीसाठी संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर काम करणार असून, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याची माहिती पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी दिली.