मराठीसाठी बाळासाहेबांनी सत्तेला लाथ मारली, त्यांच्यामुळेच मी पक्ष काढू शकलो; राज ठाकरेंनी दिला बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा

1995 चा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला ते म्हणाले, शिवसेना - भाजप युती मुख्यमंत्रीपदावरुन अडली होती. मी तेव्हा मातोश्रीत बसलो तेव्हा दोन गाड्या आल्या. त्यातून प्रकाश जावडेकर आणि भाजपचे दोन चारजण आले व मला म्हणाले, बाळासाहेबांना भेटायचे. मी म्हटलो ते बाळासाहेब झोपले. सत्तास्थापनेबद्दल बोलायचे हे त्यांनी मला सांगितले. निरोप द्याल का? असे सांगितल्यानंतर मी देतो असे म्हणालो. सुरेश जैन हे युतीचे मुख्यमंत्री असतील हे कानावर घाला असेही त्यांनी सांगितले.

  मुंबई – मुख्यमंत्री मराठी हवा असे ते सांगितले. अर्थात मराठीसाठी ते सत्तेवर लाथ मारायलाही तयार होते. राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब कठोर, मुलायम दोन्ही होते ते साधे होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या तैलचित्राचे अनावरण विधानभवनातील मध्यवर्ती सभागृहात आज झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तैलचित्राचे अनावरण केले. यावेळी राज ठाकरे बोलत होते.

  मराठीसाठी सत्तेला लाथ
  1995 चा किस्सा राज ठाकरेंनी सांगितला ते म्हणाले, शिवसेना – भाजप युती मुख्यमंत्रीपदावरुन अडली होती. मी तेव्हा मातोश्रीत बसलो तेव्हा दोन गाड्या आल्या. त्यातून प्रकाश जावडेकर आणि भाजपचे दोन चारजण आले व मला म्हणाले, बाळासाहेबांना भेटायचे. मी म्हटलो ते बाळासाहेब झोपले. सत्तास्थापनेबद्दल बोलायचे हे त्यांनी मला सांगितले. निरोप द्याल का? असे सांगितल्यानंतर मी देतो असे म्हणालो. सुरेश जैन हे युतीचे मुख्यमंत्री असतील हे कानावर घाला असेही त्यांनी सांगितले. त्यांना मी म्हणालो ”ऐ काका उठ” तुमच्याकडे जावडेकर आले. सरकार स्थापन करण्याची चर्चा करायची असे सांगितले. मुख्यमंत्री मराठी हवा असे ते सांगितले. अर्थात मराठीसाठी ते सत्तेवर लाथ मारायलाही तयार होते. राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब कठोर, मुलायम दोन्ही होते ते साधे होते. अनेक पराभव झालेल्यांना बाळासाेहबांनी सांभाळले. ते एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. त्यांचा सहवास मला मिळाला. त्यामुळेच मी काही गोष्टी पाहू शकलो, त्यामुळेच मी स्वतःचा राजकीय पक्ष काढू शकलो.

  सव्वातीन वर्षांनंतर बाळासाहेबांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट नाव लागले
  राज ठाकरे म्हणाले, सव्वातीन वर्षांनंतर बाळासाहेबांच्या नावासमोर हिंदुहृदयसम्राट नाव लागले. ज्या व्यक्तीमुळे उपस्थित आणि अनुपस्थित लोकांना ही इमारत बघायला मिळाली ते बाळासाहेब ठाकरेंमुळे. दोन तैलचित्र या विधानभवनात आणखी हवे त्यामुळे अनेकांना कळेल की आपण कुणामुळे इथपर्यंत आलो. बाळासाहेबांचा सहवास कडेपासून व्यंगचित्र आणि राजकारणापर्यंत आहेत. वारसा हा वास्तूचा नसतो विचारांचा असतो. जर मी काही जपले तर ते विचारांचा वारसा जपला.

  बाळासाहेब बाहेर वेगळे आणि आत वेगळे कधीच नव्हते
  राज ठाकरे म्हणाले, नारायण राणेंना काही गोष्टी सांगता येणार नाही. मला विनोद म्हणून काही गोष्टी सांगता येणार नाही. पण बाळासाहेब मुलायम आणि कडवट होते. संस्कार कुणी करीत नाही ते होताना वेचायचे असतात. मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. माझा जन्म एका कडवट मराठी आणि हिंदुत्ववादी घरात झाला आहे. हे मराठीपण मला आजूबाजूला पाहायला मिळाले. बाळासाहेब बाहेर वेगळे आणि आत वेगळे कधीच नव्हते.